Supriya Sule Amit Shah Meet | राज्यातील २९ महापालिकांचा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत. यावेळी सुप्रिया सुळे यांच्यासोबत शरद पवार गटातील सर्व खासदारही उपस्थित असणार आहेत. राज्यातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर भेट घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. पुण्यात राष्ट्रवादी एकत्र ? पिंपरी चिंचवड शहरात पवार काका-पुतणे एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे निवडणूक प्रमुख नाना काटे आणि शरद पवार राष्ट्रवादीच्या निवडणूक कोअर कमिटीचे सदस्य सुनील गव्हाणे या दोघांची बैठक पार पडली. ‘सुप्रिया ताईंचा मला काही दिवसांपूर्वी फोन आला होता. तेव्हा त्यांनी पिंपरी चिंचवडमध्ये मतविभाजन न करण्याचा आणि शरद पवार गटाच्या स्थानिकांशी चर्चा करण्याचा सल्ला दिला, ‘असा दावा नाना काटे यांनी केला. फडणवीसांच्या घोषणेवर अजित पवारांची प्रतिक्रिया अलीकडेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी आम्ही वेगवेगळे निवडणुकीला सामोरे जाऊ, अशी घोषणा पुण्यातून केली. त्यावर अजित पवार यांनी “शेवटी ते राज्याचे प्रमुख आहेत, त्यांना योग्य वाटतं ते स्टेटमेंन्ट त्यांनी केलेलं आहे. मला त्यांनी काय सांगितलंय ते माहिती नाही; परंतु, त्यांनी सागितलं म्हणजे चर्चा होऊनच ते बोलले म्हणूनच तर त्यांनी सांगितलं,” असे म्हंटले आहे. हेही वाचा: Celina Jaitly: सेलिना जेटलीने पतीकडून १०० कोटींची भरपाई आणि दरमहा १० लाखांचा खर्च मागितला