Supriya Sule : गेल्या काही चार ते पाच दिवसांपासून इंडिगो विमानसेवेच्या विस्कळितपणामुळे प्रवाशांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. प्रवाशांची गैरसोय झाली असून, यााबत प्रवाशी इंडिगो विमानसेवेच्या कारभावर टीका करत आहेत. गेल्या दोन दिवसांत पुणे विमानतळावरून इंडिगोची १६ हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली. तर १९ हून अधिक विमानांना प्रचंड विलंब झाला आहे. असेच चित्र देशातील बंगळुरू, हैदराबाद, कोलकत्ता विमानतळांवर पाहायला मिळाले. संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू असून या विमानसेवेचा फटका काही खासदारांनीही बसल्याचे समोर आले आहे. लवकरच यावर तोडगा काढण्यात येणार असल्याचे इंडिगोकडून सांगण्यात आले असून, यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. इंडिगो विमानसेवेवर भारत सरकारने कारवाई केली पाहिजे, अशी मोठी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे. इंडिगोच्या कारभावर सुळेंनी नाराजी व्यक्त केली. ही अपेक्षा नव्हती अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. त्यामुळे चौकशी लावण्यात यावी. इंडिगोचं नक्की झालयं काय आणि त्याला जबाबदार कोण? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे. नेमकं काय म्हणाल्या सुप्रिया सुळे? संसदेतही आम्ही हा मुद्दा उचलेला आहे. सरकारने याबाबत संसदेत उत्तर दिले पाहिजे. एकढा विस्कळितपणा झाला कसा? या प्रवाशांमध्ये रुग्ण होते, अनेकांच्या घरातील दगावले होते ते पोहचू शकले नाहीत. कोणाच्या घरात लग्न होते, कोण विद्यार्थी होते, वेळ आणि पैसा सर्वच विस्कळित झाले असून इंडिगोकडून आम्हाला ही अपेक्षा नव्हती. भारत सरकारने इंडिगोसारख्या पाच एअरलाइन्स केल्या पाहिजेत, ज्यामध्ये एकाकडे असा कोणताही कंट्रोल राहता कामा नये. पैशांचेही नुकसान झाले आणि प्रवाशांचेही हाल झाले. याची एक चौकशी लावण्यात यावी. इंडिगोचं नक्की झालयं काय आणि त्याला जबाबदार कोण? नेमकं प्रकरण काय? देशातील सर्वांत मोठी विमानसेवा कंपनी म्हणून इंडिगोची ओळख आहे. सध्या इंडिगोची विमानसेवा पूर्णपणे सुरळीत झाली असून ती सुरू होण्यासाठी फेब्रुवारी उजाडेल, अशी माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे. प्रवाशांना होणाऱ्या मनस्तापाबद्दल कंपनीकडून माफी मागण्यात आली असून, तिकटाचे पैसे परत दिले जातील असे सांगण्यात आले आहे. गुरूवारी दिवसभरात दिल्ली, मुंबई, बंगळुरूसह देशातील अन्य विमानतळांवरून 550 पेक्षा जास्त देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली. या गोंधळाचे मूळ कारण विमानतळ प्रशासनाच्या कमी क्षमतेपेक्षा इंडिगोच्या अंतर्गत व्यवस्थापनातील गंभीर त्रुटी असल्याची माहिती आहे. हेही वाचा : Sonu Sood: इंडिगो एअरलाइनच्या कर्मचाऱ्यांच्या समर्थनार्थ सोनू सूद; म्हणाले… “स्वतःला त्यांच्या जागी कल्पना करा”