सुप्रिया सुळे संतापल्या,”पुण्यात पाणी जाण्यासाठी जागाच ठेवलेली नाही”

Supriya Sule । राज्याच्या विविध भागात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. पावसामुळे अनेक भागात जनजीवन विस्कळीत झाले आहे. सध्या पुण्यात पावसाची तुफान बॅटिंग सुरू झाली आहे. दरम्यान, आजही पुणे जिल्ह्यात मुसळधार पावसाचे संकेत आहेत. मुसळधार पावसामुळे आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
जोरदार पावसामुळे किरकटवाडी येथील ओढा दुथडी भरून वाहत आहे. या परिसरातील काही झाडे उन्मळून पडली असून ती लोखंडी पुलास जाऊन अडकली आहेत. यामुळे पावसाचे पाणी या झाडांवरुन वाहत आहे. पावसाचे पाणी वाढले तर या परिसरातील घरांमध्ये पाणी घुसण्याची शक्यता आहे.जिल्हाधिकारी,पुणे आणि महापालिका… pic.twitter.com/f8UAH9uGCo
— Supriya Sule (@supriya_sule) July 25, 2024
मागच्या २४ तासात पुणे शहरात अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली आहे. तर झाडेही कोलमडल्याच्या घटना घडल्या आहे. पुण्यात काल पासून आजसकाळी सात वाजेपर्यंत अग्निशमन दल नियंत्रण कक्षात अनेक ठिकाणी पावसामुळे नुकसान झाल्याच्या घटनांच्या नोंदी करण्यात आल्या आहेत. यामध्ये झाडे कोसळण्याच्या एकूण ४५ घटना घडल्या आहेत. याचदरम्यान राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी वृत्त माध्यमांशी बोलताना सरकारवर निशाणा साधला.
पुण्यातील परिस्थिती अतिशय चिंताजनक आणि भयानक आहे. मला आश्चर्य वाटलं, जेव्हा मंत्री पुण्यातील परिस्थिती नियंत्रणात आहे, असं बोलत आहे. सर्व यंत्राणा कामाला लागली आहे. त्याबद्दल मी मंत्रींचे आभार मानते. परंतु नियंत्रणात काहीही नाही. लोक पॅनिक झाले आहे. लोकांकडे खाण्यासाठी-पिण्यासाठी काहीही नाहीय, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
Supriya Sule पाणी जाण्यासाठी जागाच ठेवलेली नाही
पुण्यात ज्या प्रकारची कामं झालीत, त्यामुळे पाणी जाण्यासाठी जागाच ठेवलेली नाही. खासदार मुरलीधर मोहळ म्हणाले की, नद्यांच्या पात्रांजवळ जास्त पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. रस्ते, मेट्रोची काम झालीत, यावेळी नाल्याचं प्लॅनिंगच नाही झालं मी नेहमी सांगत आलीय, विकास कामाच्याबाबतीत हलगर्जीपणा नको. गेले अनेक वर्षे प्रशासनाकडून इन्फ्रास्ट्रक्चरची काम झालेली आहे, त्यामुळे आजची परिस्थिती निर्माण झाली आहे. यामध्ये सर्वसामान्य नागरिक भरडला जातोय, अशी टीका सुळे यांनी केली.





