Rahul Gandhi : सावरकर प्रकरणात राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; न्यायालयाने काय सांगितलं पाहा…

Rahul Gandhi | Vinayak Damodar Savarkar – उत्तर प्रदेशात काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरुद्ध दाखल झालेल्या फौजदारी खटल्याच्या सुनावणीवरील स्थगिती सर्वोच्च न्यायालयाने आज वाढवली. २०२२ मध्ये राहुल यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत केलेल्या टिप्पणीवरून ते अडचणीत आले आहेत.
न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती ऑगस्टीन जॉर्ज मसीह यांच्या खंडपीठाने या प्रकरणातील त्यांची स्थगितीची मागणी मान्य केली आहे आणि सुनावणी चार आठवड्यांसाठी तहकूब केली आहे.
उत्तर प्रदेश सरकारच्या वतीने उपस्थित असलेल्या ज्येष्ठ वकील गरिमा प्रसाद यांनी न्यायालयाला सांगितले की, राज्याने राहुल गांधींच्या याचिकेवर उत्तर दाखल केले आहे. उत्तर प्रदेश सरकारने न्यायालयाला सांगितले की, वकील नृपेंद्र पांडे यांनी दाखल केलेली तक्रार योग्य आहे. समाजात द्वेष पसरवण्याच्या उद्देशाने राहुल गांधी यांचे विधान देण्यात आले होते.
२५ एप्रिल रोजी या प्रकरणाची सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते की, राहुल गांधी यांचे वक्तव्य बेजबाबदार आहे. स्वातंत्र्यसैनिकांची खिल्ली उडवता येणार नाही. तथापि, न्यायालयाने राहुल गांधींविरुद्ध दाखल केलेल्या फौजदारी कारवाईला स्थगिती दिली होती.





