सुपरहिट ‘कांतारा चॅप्टर १’ चित्रपट ओटीटीवर येण्यास सज्ज; कधी आणि कुठे पाहता येणार?

Kantara Chapter 1 | ऋषभ शेट्टीची मुख्य भूमिका असलेल्या ‘कांतारा चॅप्टर १’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. या चित्रपटाने जगभरात दमदार कमाई केली आहे. बॉक्स ऑफिसवर मिळालेल्या यशानंतर, हा चित्रपट आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर येण्यास सज्ज झाला आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून चित्रपटाच्या ओटीटी रिलीजची तारीख जाहीर करण्यात आली आहे.
ऋषभ शेट्टी दिग्दर्शित ‘कांतारा चॅप्टर १’ हा चित्रपट अमेझॉन प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. प्राइम व्हिडीओने १९ सेकंदांच्या प्रोमोसह कांतारा चॅप्टर १ ची ओटीटी रिलीज डेट जाहीर केली आहे. “कांताराचा थरार पाहायला तयार राहा, कारण हा चित्रपट ३१ ऑक्टोबर रोजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर येतोय,” असं या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. त्यामुळे हा चित्रपट तुम्हाला घर बसल्या पाहता येणार आहे. Kantara Chapter 1 |
View this post on Instagram
कांतारा चॅप्टर १’ या चित्रपटाने जगभरात ७८० कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाने भारतात बॉक्स ऑफिसवर अंदाजे ६६७ कोटींची कमाई केली आहे. हा चित्रपट म्हणजे २०२२ साली प्रदर्शित झालेल्या ‘कांतारा’ या सुपरहिट चित्रपटाचा प्रीक्वल आहे. या चित्रपटात तुलू परंपरेतील दैव कोला या प्राचीन श्रद्धेचा जागतिक स्तरावर परिचय करून देण्यात आला होता.
या चित्रपटात रुक्मिणी वसंत, गुलशन देवैया आणि जयराम यांचीही महत्त्वपूर्ण भूमिका असून, हा चित्रपट होमबाले फिल्म्स या बॅनरखाली निर्मित करण्यात आला आहे. Kantara Chapter 1 |
हेही वाचा:
recipes: पुलाव आणि बिर्याणी खाऊन कंटाळलात? मग करा काहीतरी हटके… बनवा मसाला वांगी भात!





