ऋषभचं भरभरून कौतुक! पत्नी प्रगतीला अश्रू अनावर; ‘कांतारा चॅप्टर 1’ च्या स्क्रिनिंगनंतर नेमकं काय घडलं? व्हिडीओ व्हायरल

Viral video : आज दसऱ्याच्या मुहूर्तावर अभिनेता आणि दिग्दर्शक ऋषभ शेट्टीचा ‘कांतारा चॅप्टर १’ प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळताना दिसत आहे. ऋषभचं भरभरून कौतुक प्रेक्षक करत आहेत. या चित्रपटाच्या एका स्पेशल स्क्रिनिंगनंतर ऋषभ शेट्टीची पत्नी भावूक झाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
कांताराच्या स्पेशल स्क्रिनिंगला ऋषभ शेट्टी आणि त्याची पत्नी प्रगती शेट्टी यांनी हजेरी लावली होती. या स्क्रिनिंगनंतर प्रेक्षकांनी कांताराचं कौतुक केलेच याशिवाय ऋषभचेही भरभरून कौतुक केले. हे कौतुक पाहून प्रगतीला अश्रू अनावर झाले आणि तिचे डोळे पाणावले. यावेळी प्रगतीला ऋषभने धीर दिला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, नेटकऱ्यांकडून कमेंट्स करण्यात येत आहेत.
View this post on Instagram
दुसरा एक व्हिडीओ व्हायरल झाला असून या व्हिडीओत ऋषभ प्रेक्षकांचे आभार मानताना दिसत आहे, त्याला मिळत असलेल्या प्रतिसादाने तो खूश आहे. ‘कांतारा चॅप्टर १’ हा २०२२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कांतारा’चा प्रीक्वल आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन ऋषभ शेट्टीने केले आहे आणि तो चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. ऋषभसोबत, या चित्रपटात रुक्मिणी वसंत, जयराम आणि गुलशन देवैया यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
ऋषभ शेट्टीने या चित्रपटासाठी खूप मेहनत घेतली आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला असून, आपल्या प्रतिक्रिया प्रेक्षक सोशल मीडियाच्या माध्यमातून देत आहेत. यामुळे पहिल्या दिवशी किती कोटींची कमाई कांतारा चॅप्टर १ करतो हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
हेही वाचा : ‘संघात कधीही जातीय भेदभाव होत नाही’; RSSच्या विजयादशमी मेळाव्यात माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे विधान





