जांबुत : जांबुत (ता. शिरूर) येथील डीसीएम शिक्षण संस्थेच्या जय मल्हार हायस्कुल येथे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असलेले सुनिल जाधव यांना खेड तालुका माध्यमिक मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर संघाच्या जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. रविवारी (दि. ७) रोजी खेड (राजगुरूनगर) येथील रिद्धी सिद्धी मंगल कार्यालयात या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी पुणे विभाग शिक्षक आमदार जयंत आसगावकर हे होते. कार्यक्रमप्रसंगी खेडचे आमदार बाबाजी काळे, माजी आमदार दिलीप मोहिते यांचेसह माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी डॉ. भाऊसाहेब कारेकर, प्राथमिक विभाग शिक्षणाधिकारी संजय नाईकडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मलाताई पानसरे, माजी जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख, शरद बुट्टे, शिवसेना नेते भगवान पोखरकर तनुजा घनवट, प्राचार्य इन. पी.शेंडकर, महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघाचे सचिव नंदकुमार सागर, अमोल पवार, अरुण चांभारे, विजय शिंदे, अंकुश राक्षे, सुरेश शिंदे, अनिल राक्षे, सुधीर मुंगसे जिल्हातील मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुख्याध्यापक सुनिल जाधव यांची विद्यार्थप्रिय शिक्षक म्हणून ओळख असून विध्यार्थ्यांच्या विविध कला गुणांना वाव मिळवून देण्यासाठी नेहमीच त्यांचा प्रयत्न राहिलेला आहे. विविध परीक्षांच्या माध्यमातून व क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून त्यांनी तालुक्यात आपल्या विद्यालयाचे नाव उंचावण्यासाठी नेहमीच महत्वाची भूमिका बजावली असून मुख्याध्यापक जाधव यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे जांबुत आणि परिसरातून अभिनंदन करण्यात येत आहे.