Sunil Gavaskar Statement : पाकिस्तानवर कठोर कारवाई व्हायलाच हवी!” पळपुटेपणावर सुनील गावस्कर संतापले; ICC ला दिला ‘हा’ सल्ला
Sunil Gavaskar Statement : पाकिस्तानच्या भारत बहिष्कारावर भारताचे माजी खेळाडू सुनील गावस्कर संतापले असून आयसीसीला कारवाई करण्याचा सल्ला दिला आहे.

Sunil Gavaskar Statement on Pakistan Boycott : टी-२० वर्ल्ड कप २०२६ मध्ये पाकिस्तानने भारताविरुद्धचा सामना खेळण्यास नकार दिला आहे. पाकिस्तानच्या या भूमिकेवर भारताचे महान क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत. “ऐनवेळी सामन्यातून मागे हटणे ही गंभीर बाब असून, भविष्यात इतर कोणत्याही संघाने असे धाडस करू नये, यासाठी आयसीसीने पाकिस्तानवर कडक कारवाई करायला हवी,” असे स्पष्ट मत गावस्कर यांनी व्यक्त केले आहे.
“पाकिस्तानचा हा निव्वळ पळपुटेपणा!”
पाकिस्तान सरकारने १५ फेब्रुवारी रोजी कोलंबोमध्ये होणाऱ्या भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. यावर ‘इंडिया टुडे’शी बोलताना गावस्कर म्हणाले, “जर तुम्ही खूप आधी स्पर्धेतून माघार घेतली असती, तर ती वेगळी गोष्ट होती. मात्र, स्पर्धा तोंडावर असताना आणि शेवटच्या क्षणी असा निर्णय घेणे चुकीचे आहे. आयसीसीने यावर कायदेशीर कारवाई करायला हवी.”
‘If you withdraw at the last moment…’: Sunil Gavaskar takes swipe at Pakistan boycott
Gavaskar also added that the issue was the last-minute withdrawal and that ICC should take action against Pakistan should they choose to stick to their decision.#K9WinNews #SunilGavaskar pic.twitter.com/ouQGbRWLnU— K9Win News (@K9winnews) February 2, 2026
आयसीसी घेणार कायदेशीर अॅक्शन?
पाकिस्तानने भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकल्याबद्दल सुनील गावस्करांची संतप्त प्रतिक्रिया
गावस्कर यांनी पुढे नमूद केले की, आयसीसी पाकिस्तान सरकारच्या या निर्णयामुळे अजिबात आनंदी नसेल. “आयसीसी पाकिस्तानविरुद्ध कायदेशीर पावले उचलू शकते, परंतु त्या निकालाचे काय होईल हे सांगता येणार नाही. मात्र, या प्रकरणात अनेक क्रिकेट बोर्डांचे हित गुंतलेले असल्याने हा निर्णय कोणा एका व्यक्तीचा नसेल. अशा प्रकारच्या निर्णयामुळे खेळाचे आणि जागतिक स्पर्धेचे मोठे नुकसान होते,” असेही त्यांनी सांगितले.
बहिष्कारामागे बांगलादेशचे समर्थन?
पाकिस्तानने या बहिष्काराचे कोणतेही अधिकृत कारण दिलेले नाही. मात्र, सुरक्षा कारणास्तव भारतात खेळण्यास नकार दिल्याने आयसीसीने बांगलादेशला स्पर्धेतून बाहेर काढले होते. पाकिस्तान सुरुवातीपासूनच या वादात बांगलादेशच्या बाजूने उभा होता. त्यामुळेच बांगलादेशला पाठिंबा देण्यासाठी त्यांनी भारताविरुद्धचा सामना न खेळण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.





