IND vs ENG : सुनील गावस्करांनी इंग्लंडचा केला पर्दाफाश; खेळपट्टीबद्दल असे विधान केले की, स्टोक्स रागाने होईल लाल

खेळपट्टी गोलंदाजांसाठी अनुकूल –
सुनील गावस्कर म्हणाले, इंग्लंडकडे चांगले गोलंदाज नाहीत, म्हणून त्यांनी अशी खेळपट्टी तयार केली आहे. ओव्हलची खेळपट्टी वेगवान गोलंदाजांसाठी खूपच अनुकूल ठरली. खेळपट्टीवर गवत असल्याने गोलंदाजांना चेंडूला स्विंग आणि उसळी मिळत होती, विशेषतः ढगाळ वातावरणात. इंग्लंडच्या गस एटकिन्सनने पदार्पणाच्या सामन्यात पहिल्या डावात 5 विकेट्स घेतल्या. मात्र, जोश टंग आणि जेमी ओव्हरटन यांना लय सापडली नाही. ख्रिस वोक्स ला क्षेत्ररक्षणादरम्यान खांद्याला दुखापत झाल्याने तो सामन्यातून बाहेर झाला आहे.
गावस्कर यांचे इंग्लंडच्या गोलंदाजीवर टीकास्त्र –
माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी इंग्लंडच्या गोलंदाजी आणि खेळपट्टीवर प्रश्न उपस्थित केले. ते म्हणाले, “इंग्लंडकडे सध्या मजबूत गोलंदाजी आक्रमण नाही. बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर आणि ब्रायडन कार्स हे प्रमुख गोलंदाज खेळत नाहीत. स्टोक्सने या मालिकेत सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत, तर आर्चर आणि कार्स यांनीही नियमितपणे विकेट्स घेतल्या. पण ते नसताना इंग्लंडने गोलंदाजांना मदत व्हावी म्हणून अशी खेळपट्टी तयार केली.” गावस्कर यांच्या मते, इंग्लंडने कमकुवत गोलंदाजीमुळे खेळपट्टीवर गवत ठेवून स्विंग आणि उसळी मिळवण्याचा प्रयत्न केला.
हेही वाचा – IND vs ENG : इंग्लंडला बसला मोठा धक्का! ख्रिस वोक्सच्या दुखापतीमुळे संघाच्या वाढल्या अडचणी
भारतीय फलंदाजांनी केली चांगली कामगिरी –
पहिल्या डावात पावसामुळे खेळात अनेकदा अडथळा आला, तरी भारतीय फलंदाजांनी संयमाने फलंदाजी केली. करुण नायरने अर्धशतक झळकावत संघाला सावरले. मात्र, इंग्लंडच्या गोलंदाजांनी खेळपट्टीचा फायदा घेत भारताचा डाव 224 धावांवर गुंडाळला. आता इंग्लंडची फलंदाजी आणि भारतीय गोलंदाजांचा कस पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.





