IND vs ENG : इंग्लंडला बसला मोठा धक्का! ख्रिस वोक्सच्या दुखापतीमुळे संघाच्या वाढल्या अडचणी

IND vs ENG Chris Woakes ruled out after shoulder injury : भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील पाचवा आणि अंतिम कसोटी सामना द ओव्हल येथे खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना नायर-सुंदर यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर २२४ धावा केल्या. दरम्यान पहिल्या दिवसाचा खेळ संपताना इंग्लंड संघाला मोठा धक्का बसला. त्यांचा अष्टपैलू खेळाडू ख्रिस वोक्सच्या खांद्याला गंभीर दुखापत झाल्याने तो या सामन्यातून बाहेर पडला आहे.
ख्रिस वोक्सला कशी झाली दुखापत?
पहिल्या दिवशी करुण नायरच्या शॉटला बाउंड्रीवर थांबवण्यासाठी वोक्सने बाउंड्रीकडे धाव घेतली. त्याने चेंडू थांबवला आणि चौकार वाचवला, पण याचवेळी त्याच्या खांद्याला गंभीर दुखापत झाली. चेंडू थांबवताना तो सरकत बाउंड्रीच्या बाहेर गेला, ज्यामुळे त्याला मोठी इजा झाली. इंग्लंडच्या वैद्यकीय पथकाने तातडीने त्याच्या दुखापतीची पाहणी केली आणि दुखापत गंभीर असल्याचे निदान झाले. त्यानंतर वोक्सला डगआउटमध्ये नेण्यात आले.
Michael Oh Michael you didn’t need to do Chris Woakes like this. https://t.co/h8jr2AUjjO pic.twitter.com/yWPkPZrhg4
— Vipul 🇮🇳 (@Vipul_Espeaks) August 1, 2025
वोक्सच्या दुखापतीमुळे इंग्लंडची वाढली चिंता –
England lose Chris Woakes for the rest of the final Test against India.#WTC27 | #ENGvIND | ✍️: https://t.co/CIwtaoh1TZ pic.twitter.com/jDrfryRJFV
— ICC (@ICC) August 1, 2025
शुक्रवारी दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू होण्यापूर्वी इंग्लंड क्रिकेट बोर्डाने (ECB) स्पष्ट केले की, ख्रिस वोक्स आता या सामन्यात पुनरागमन करू शकणार नाही. यामुळे इंग्लंड संघासमोर मोठे संकट उभे राहिले आहे. आयसीसीच्या नियमांनुसार, दुखापतग्रस्त खेळाडूच्या जागी फलंदाजी आणि गोलंदाजी करता येत नाही, फक्त क्षेत्ररक्षणासाठी बदली खेळाडू घेता येतो. याचा अर्थ, इंग्लंडला आता एका गोलंदाजाशिवाय खेळावे लागेल आणि फलंदाजीवेळी त्यांचे नऊ विकेट पडल्यानंतरच संघ सर्वबाद मानला जाईल.
हेही वाचा – IND vs ENG : टीम इंडियाने रचला नवा इतिहास! मोडला ६१ वर्षांपूर्वीचा विक्रम
मालिकेचा निर्णय या सामन्यावर अवलंबून –
या सामन्याचा निकाल मालिकेच्या विजेतेपदासाठी महत्त्वाचा आहे. सध्या इंग्लंड संघ मालिकेत आघाडीवर आहे. जर त्यांनी हा सामना जिंकला, तर मालिका त्यांच्या नावावर राहिल. मात्र, भारताने हा सामना जिंकल्यास मालिका बरोबरीत सुटेल. सुदैवाने, हा मालिकेचा शेवटचा सामना असल्याने वोक्सला बरे होण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल. तरीही, इंग्लंडसाठी ही मोठी चिंता आहे, कारण वोक्स हा त्यांच्या संघातील महत्त्वाचा खेळाडू आहे.





