Sunetra Pawar : राज्यसभा खासदारपदाचा राजीनामा दिल्यानंतर सुनेत्रा पवार यांच्या जागी कोणाला संधी मिळणार, याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत विक्रमी विजय मिळवल्यानंतर त्यांनी आमदारकी स्वीकारत राज्यसभेची जागा रिक्त केली आहे. (Sunetra Pawar) या रिक्त जागेसाठी पक्षात अनेक दिग्गज इच्छुक असल्याचे दिसत आहे. त्यामध्ये छगन भुजबळ यांचे नाव आघाडीवर असल्याची चर्चा आहे. यापूर्वीही त्यांची राज्यसभेसाठी इच्छा होती, त्यामुळे त्यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना संधी दिली जाऊ शकते, असे बोलले जात आहे. (Sunetra Pawar) याशिवाय जय पवार यांचे नावही चर्चेत असून त्यांचे राजकीय पुनर्वसन करण्याचा पर्याय पक्षासमोर आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रातील समीकरणे लक्षात घेता नितीनकाका पाटील यांचाही विचार होऊ शकतो. (Sunetra Pawar) दरम्यान, समीर भुजबळ आणि आनंद परांजपे यांची नावेही चर्चेत आहेत. त्यामुळे अंतिम निर्णय कोणाच्या बाजूने होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Sunetra Pawar) जर छगन भुजबळ यांची राज्यसभेत वर्णी लागली, तर त्यांच्या मंत्रिपदाची जागा रिक्त होऊ शकते. अशा परिस्थितीत धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे राज्याच्या राजकारणात नव्या घडामोडींना वेग येण्याची चिन्हे आहेत. (Sunetra Pawar)