Paris Paralympics 2024 : भारताला मिळाले 12वे पदक, सुहास यतिराजनं बॅडमिंटनमध्ये पटकावलं रौप्यपदक…

Paris Paralympics 2024 (Badminton) : सुहास यतिराजने पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये रौप्य पदक जिंकले आहे. पुरुष एकेरीच्या SL4 प्रकारातील अंतिम फेरीत त्याला फ्रान्सच्या लुकास माझूरविरुद्ध 21-9,21-13 असा पराभव पत्करावा लागल्याने रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. या खेळांमधील भारताचे हे एकूण 12 वे आणि बॅडमिंटनमधील एकूण चौथे पदक आहे.
सुहासला या प्रकारात पहिले मानांकन मिळाले होते, पण सुवर्णपदकाच्या लढतीत त्याला निराशाजनक पराभवाला सामोरे जावे लागले. सुहास पहिल्या गेमपासूनच संघर्ष करताना दिसला आणि एकेकाळी पहिल्या गेममध्ये तो 10-2 ने पिछाडीवर होता आणि शेवटी त्याला 21-9 ने पराभव पत्करावा लागला. दुसऱ्या गेममध्येही त्याची अवस्था तशीच होती. सामन्याच्या शेवटच्या क्षणांमध्ये त्यांनी पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला, पण अखेर त्याला 21-13 असा पराभव स्वीकारावा लागला.
Medal No. 1⃣2⃣ for India at the Paris Paralympics.
Heartbreaking loss for India’s Suhas Lalinakere Yathiraj in the Men’s Singles SL4 final at the 2024 Paralympics, as he fell to Lucas Mazur of France in straight sets, 21-9, 21-13.#Paralympics #Badminton @mansukhmandviya… pic.twitter.com/tL4rXAdH8c
— Doordarshan Sports (@ddsportschannel) September 2, 2024
दरम्यान, गेल्या वेळीही टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सुहासने पुरुष एकेरी SL4 प्रकारात रौप्य पदक जिंकले होते. योगायोगाने टोकियो पॅरालिम्पिकच्या अंतिम फेरीत त्याचा पराभव करणारा खेळाडू फ्रान्सचा लुकास माझूर हाच होता. सुहास गेल्या वेळी 21-15, 17-21, 15-21असा पराभूत झाला होता. सुहास यतिराजचे हे सलग दुसरे पॅरालिम्पिक होते, परंतु दोन्ही वेळा तो सुवर्णपदक जिंकण्यात अपयशी ठरला आहे.
Paris Paralympics 2024 : भारताच्या मेडलचा आकडा दुहेरी अंकात, बॅडमिंटनमध्ये एकाच दिवशी जिंकली 3 पदके…
याआधी भारताच्या इतर 3 खेळाडूंनी बॅडमिंटनमध्ये पदके जिंकली आहेत. नितेश कुमारने सुवर्ण, तुलसीमती मुरुगेसनने रौप्य आणि मनीषा रामदासने कांस्यपदकावर निशाणा साधला आहे. टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताला बॅडमिंटनमध्ये फक्त एकच पदक मिळाले होते, पण पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये बॅडमिंटनपटूंनी एकूण 4 पदके जिंकली आहेत.





