Paris Paralympics 2024 : भारताच्या मेडलचा आकडा दुहेरी अंकात, बॅडमिंटनमध्ये एकाच दिवशी जिंकली 3 पदके…

Paris Paralympics 2024 (ParaBadminton Women’s Singles SU5) : पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये पाचव्या दिवशी भारतीय महिला बॅडमिंटनपटूंनी चमकदार कामगिरी करत दोन पदके जिंकली आहेत. तुलसीमाथी मुरुगेसनने (Thulasimathi Murugesan) महिला एकेरीच्या एसयू5 (SU5) प्रकारात रौप्यपदक तर मनीषा रामदासने (Manisha Ramadass) याच प्रकारात कांस्यपदक जिंकले.
पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताने आतापर्यंत 11 पदके जिंकली आहेत. त्याचबरोबर एकाच दिवशी बॅडमिंटनमध्ये देशाला तिसरे पदक मिळाले आहे. मुरुगेसन आणि मनीषा यांच्या आधी नितीश कुमारने पुरुष एकेरी एसएल3 (SL3) प्रकारात सुवर्णपदक जिंकले होते.
SILVER 🥈 For INDIA 🇮🇳
🏸 Thulasimathi Murugesan loses against Yang Qiuxia of China by 17-21, 10-21 in the Women’s singles SU5 Final.#Paris2024 #Cheer4Bharat #Paralympics2024 #ParaBadminton @mansukhmandviya @MIB_India @PIB_India @IndiaSports @ParalympicIndia @PCI_IN_Official… pic.twitter.com/V8eib5jRXS
— Doordarshan Sports (@ddsportschannel) September 2, 2024
वास्तविक, पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये सोमवारी(दि.2 सप्टेंबर) म्हणजेच पाचव्या दिवशी भारताने अवघ्या 10 मिनिटांत 2 पदके जिंकली. एकीकडे तुलसीमती मुरुगेसनला बॅडमिंटनमध्ये रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
🏸 Manisha Ramadass’ incredible Bronze medal 🥉 victory in Women’s Singles SU5 badminton at #Paris2024!
Her determination and skill shine bright, adding to India’s medal tally! #Cheer4Bharat #Paralympics2024 #Parabadminton @mansukhmandviya @IndiaSports @MIB_India… pic.twitter.com/Yvfvt07wIU
— Doordarshan Sports (@ddsportschannel) September 2, 2024
महिला एकेरीच्या SU5 प्रकारातील अंतिम फेरीत तिला चीनच्या यांग क्विक्सिया हिच्याकडून 21-17, 21-10 असा पराभव स्वीकारावा लागला. दुसरीकडे याच गटात मनीषा रामदासने डेन्मार्कच्या कॅथरीनचा 21-12, 21-8 असा सहज पराभव केला.
Paris Paralympics 2024 : भारताच्या नितेश कुमारचा ‘गोल्डन स्मॅश’; बॅडमिंटनमध्ये पटकावलं सुवर्णपदक…
पदकतालिकेची स्थिती कशी आहे?
पॅरिस पॅरालिम्पिकच्या पाचव्या दिवशी भारताने आतापर्यंत तीन पदके जिंकली आहेत. नितीश कुमार, तुलसीमती आणि मनीषा रामदास या तिन्ही खेळाडूंनी बॅडमिंटनमध्ये अनुक्रमे सुवर्ण, रौप्य आणि कांस्यपदके जिंकली आहेत. यासह भारताने आता 2 सुवर्ण, 4 रौप्य आणि 5 कांस्य पदकांसह एकूण 11 पदके जिंकली आहेत. भारत आता पदकतालिकेत 22 व्या स्थानावर आला आहे.



