Goa CM Pramod Sawant : अचानक छातीत दुखू लागलं अन्…; गोव्याचे मुख्यमंत्री डॅा. प्रमोद सावंत यांच्यावर पुण्यात पार पडली यशस्वी शस्त्रक्रिया
Goa CM Pramod Sawant : गोव्याचे मुख्यमंत्री डॅा. प्रमोद सावंत यांच्यावर पुण्यातील रुबी हॅाल क्लिनिकमध्ये शस्त्रक्रिया पार पडली आहे.

Goa CM Pramod Sawant : गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॅा. प्रमोद सावंत यांच्यावर पुण्यातील प्रसिद्ध रुबी हॅाल क्लिनिकमध्ये शस्त्रक्रिया पार पडली आहे. गुरुवारी अचानक सावंत यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांच्यावर हृदयाची (अँजिओप्लास्टी) यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे. Goa CM Pramod Sawant
गुरुवारी १९ मार्च रोजी डॅा. प्रमोद सावंत यांच्या छातीत अचानक दुखू लागल्याने त्यांना तातडीने रुबी हॅाल क्लिनिकमध्ये हलवण्यात आले. तेथे तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने त्यांची प्राथमिक तपासणी करून अँजिओग्राफी केली. त्यामध्ये एक ब्लॉक आढळल्याने तातडीने अँजिओप्लास्टी करण्याचा निर्णय घेण्यात आला. Goa CM Pramod Sawant
हेही वाचा : Garima Malhotra : बॅालिवूडवर शोककळा! प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा यांच्यावर कोसळला दुःखाचा डोंगर
ही शस्त्रक्रिया हृदयरोग तज्ज्ञ डॉ. समिन शर्मा यांनी यशस्वीरित्या पार पाडली. सध्या सावंत यांना आयसीयूमध्ये निरीक्षणाखाली ठेवण्यात आले असून त्यांची प्रकृती आता सुधारत आहे. पुढील काही तासांत त्यांच्या प्रकृतीबाबत सविस्तर मेडिकल रिपोर्ट समोर येतील. Goa CM Pramod Sawant
CM Pramod Sawant
काल १९ मार्च रोजी डॅा. प्रमोद सावंत यांनी गोवा राज्याच्या मुख्यमंत्रीपदाचा 7 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. गोव्याचे दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधानानंतर 19 मार्च 2019 पासून डॅा. प्रमोद सावंत हे गोव्याचे मुख्यमंत्री आहेत. मात्र, या राजकीय कारकीर्दत आता शारीरिक व्याधींचा सामाना त्यांना करावा लागत आहे. Goa CM Pramod Sawant
हेही वाचा :Alka Yagnik: ६ व्या वर्षी सुरुवात, गिनीज रेकॉर्डची कमाई; जाणून घ्या ‘या’ गायिकेचा सुरेल प्रवास!





