Garima Malhotra : बॅालिवूडवर शोककळा! प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा यांच्यावर कोसळला दुःखाचा डोंगर
Garima Malhotra : प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांची आई गरिमा मल्होत्रा यांचे निधन झाले आहे.

Garima Malhotra : बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध डिझायनर मनीष मल्होत्रा यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांची आई गरिमा मल्होत्रा यांचे निधन झाले आहे. वयाच्या 94 व्या वर्षी गरिमा मल्होत्रा यांनी अखेरचा श्वास घेतला. या दुःखद घटनेमुळे बॅालिवूड इंडस्ट्रीस मल्होत्रा कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
गरिमा मल्होत्रा यांचे निधन झाल्याचे वृत्त समजताच अनेक बॅालिवूड कलाकारांनी मनीष मल्होत्रा यांच्या सांत्वनासाठी घरी पोहचले होते. यामध्ये ऐश्वर्या राय बच्चन, अभिषेक बच्चन, मलायका अरोरा, अर्जुन कपूर , करिश्मा कपूर , सोनाली बेंद्रे, उर्मिला मातोंडकर आणि फातिमा सना शेख यांसह अनेक सेलिब्रिटींचा समावेश आहे.
मुंबईतील एका प्रतिष्ठित परिसरात मनीष मल्होत्रा आपल्या आईसह एका आलिशान घरात राहायचे. मात्र, मनीष यांच्या आईचे निधन कोणत्या कारणामुळे झाले याबद्दल माहिती समोर आलेली नाही.
मनीष मल्होत्रा यांच्या टीमकडून एक अधिकृत निवेदन जारी करण्यात आले आहे. या निवेदनात 20 मार्च रोजी सकाळी 10 वाजता गरिमा मल्होत्रा यांच्यावर अत्यंसंसस्कार पार पडणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
कोण आहेत मनीष मल्होत्रा? Garima Malhotra
देशात अनेक मोठे फॅशन डिझायनर असले तरी मनीष मल्होत्रा बॅालिवूड इंडस्ट्रीतील एक मोठं नाव आहे. मनीष मल्होत्रा आपल्या अप्रतिम डिझाइन्ससाठी ओळखले जातात. बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्री लग्नाच्या पोशाखांसाठी मनीष मल्होत्राची निवड करतात.

Manish Malhotra’s mother Garima Malhotra
कुठल्याही अवॉर्ड शोचे रेड कार्पेट असो, चित्रपटातील नायक-नायिकांचे कपडे असोत किंवा सेलिब्रिटींचे लग्न असो सगळीकडे सेलिब्रेटीजना मनीष मल्होत्राने डिझाइन केलेले कपडे आणि दागिने घालायचे असतात.
अनेक बॉलीवूड अभिनेत्रींसाठी चित्रपटांमध्ये कपडे डिझाइन करण्यासोबतच त्यांनी त्यांच्या खास दिवसांसाठी कपडेही डिझाइन केले आहेत. याच कारणामुळे बॉलिवूड सेलिब्रिटींमध्ये मनीष मल्होत्राची प्रचंड क्रेझ आहे.
हेही वाचा : Mrunal Thakur: “स्वप्नापलीकडचं आयुष्य”… मृणाल ठाकूरचा १० वर्षांचा प्रवास; चाहत्यांसाठी खास गिफ्ट!





