Nagar | तालुकास्तरीय स्पर्धेमध्ये महाजन शेतकी प्रशालेचे यश
Updated On:

श्रीगोंदा, (प्रतिनिधी) – तालुकास्तरीय विविध स्पर्धांमध्ये विद्यालयाने यश मिळवले आहे. यामध्ये कृष्णा राजेंद्र लोखंडे (वयोगट 14 बुद्धिबळ, द्वितीय) , यश अतुल कदम (वयोगट 14, लांब उडी -द्वितीय), सिद्धेश नवनाथ कंद (वयोगट14, 200 मीटर धावणे, द्वितीय),
तृप्ती सूर्यकांत बोरुडे (वयोगट 17,उंच उडी -प्रथम), श्रावणी सोपान बोरुडे (वयोगट 17,उंच उडी प्रथम). सांघिक स्पर्धेमध्ये विद्यालयातील 17 वयोगट खो खो मुली तालुका पातळीवर तृतीय,
14 वयोगट कबड्डी मुले संघ तालुका पातळीवर तृतीय क्रमांक मिळविला. यशस्वी विद्यार्थ्यांचे विद्यालयाचे विश्वस्त अमरापूरकर, मुख्याध्यापक रसाळ, क्रीडाशिक्षक भापकर, माळवदकर, सुकटे, सहशिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.





