Nagar | रुणांना रोजगाराच्या संधी प्राप्त करून देण्यावर भर- अमित गोरखे

श्रीगोंदा, (प्रतिनिधी) :सुशिक्षित तरुण आणि होतकरू बेरोजगारांसाठी आपण विशेष काम करणार आहे. लघु उदयोगासाठीच्या शासनाच्या विविध लाभदायी योजना अगदी तळागाळापर्यंत पोहचविणार असून, त्यासाठी लागणारे संबंधित बँकांचे कर्जही उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे मत आमदार अमित गोरखे यांनी व्यक्त केले.
देवदैठण (ता. श्रीगोंदा) येथे पार पडलेल्या सत्कार समारंभात गोरखे बोलत होते. यावेळी माजी आमदार राहूल जगताप, बाजार समितीचे सभापती अतुल लोखंडे, तालुका दूध संघाचे माजी अध्यक्ष सुरेश लोखंडे, माजी सरपंच जयवंत गायकवाड व सुनिता वाघमारे,
निंबराज सहकारी संस्थेचे उपाध्यक्ष मच्छिंद्र ढवळे, शिरूरचे नगरसेवक विनोद भालेराव, नीलेश गायकवाड, डॉ. भाऊसाहेब जाधव आदी उपस्थित होते.
विधान परिषदेच्या सदस्यपदी अमित गोरखे यांची आणि देवदैठण ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी सचिन लोखंडे यांची नियुक्ती झाल्याबद्दल देवदैठण ग्रामस्थाच्या वतीने माजी आमदार राहूल जगताप यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी विजय कोकाटे, मारुती वाघमारे, सर्जेराव कौठाळे, राहुल आढाव, दीपक कौठाळे, तुषार वाघमारे, गणेश बनकर, भरत थेऊरकर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. बाळासाहेब लोखंडे यांनी आभार मानले.
श्रीगोंदा तालुक्याचे भूमिपुत्र, एक सामान्य कुटूंबातील व्यक्ती विधान परिषदेत जाणे ही अभिमानाची बाब आहे. त्यामुळे नवनिर्वाचित आमदार गोरखे यांनी आता तालुक्याच्या विकासात्मक कामासाठी जास्तीत-जास्त निधी उपलब्ध करून द्यावा. राहुल जगताप , माजी आमदार





