वाघिरे महाविद्यालयात विद्यार्थी आदान-प्रदान उपक्रम

सासवड- पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वाघिरे महाविद्यालय येथील वाणिज्य विभाग आणि दामोदर महाविद्यालय गोवा यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात विद्यार्थी आदान-प्रदान उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दोन राज्यांमधील महाविद्यालयांच्या शैक्षिणक, सामाजिक आणि सांस्कृतिक बाबींची देवाणघेवाण करण्यासाठी संशोधन आणि इतर नाविन्यपूर्ण गोष्टींवर एकत्रित काम करण्यासाठी दोन महाविद्यालयांमध्ये सामंजस्य करार करण्यात आला. या कराराचा एक भाग म्हणून दामोदर महाविद्यालयाचे प्रा. विशाल चारी व 4 विद्यार्थी वाघिरे महाविद्यालयात 3 दिवसांच्या भेटीसाठी आले होते.
या उपक्रमाचे उद्घाटन वाघिरे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. यावेळी उपप्राचार्य डॉ. सतीश बोंगाणे, डॉ. किशोर लिपारे, प्रा. सायली गायकवाड, प्रा.ज्ञानेश्वर जगदाळे आणि महाविद्यालयातील वाणिज्य विभागाचे 197 विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. किशोर लिपारे यांनी केले तर प्रा. सायली गायकवाड यांनी आभार मानले.





