Lok Sabha Election 2024| लोकसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्यातील मतदान 19 एप्रिल रोजी पार पडणार आहेत. त्यानुसार पहिल्या टप्प्यातील मतदान होणाऱ्या 21 राज्यातील 102 जागांवरील बुधवारी प्रचार सभा थंडावल्या. त्यानंतर आता बारामती, पुणे, सातारा, आणि सांगलीतील उमेदवार आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. याकरिता आज महायुतीसह महाविकास आघाडीकडून शक्तीप्रदर्शन केले जाणार आहे.
बारामती लोकसभेला शरद पवार विरुद्ध अजित पवार असा थेट संघर्ष असणार आहे. बारामतीमध्ये अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यामध्ये थेट लढत होत आहे. पुण्यातील कौन्सिल हॉलमधील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात बारामती लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यात येणार आहे.
अमोल कोल्हे आणि रवींद्र धंगेकर अर्ज दाखल करणार Lok Sabha Election 2024|
याशिवाय शिरूरचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अमोल कोल्हे आणि पुण्यातील काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचे देखील अर्ज दाखल करण्यात येणार आहेत. अमोल कोल्हे आणि रवींद्र धंगेकर यांचे अर्ज पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल करण्यात येतील. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण, शिवसेना नेते खासदार संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह महाविकास आघाडीतील अनेक मोठे नेते याप्रसंगी उपस्थित राहणार आहेत.
साताऱ्यात उदयनराजे उमेदवारी अर्ज भरणार Lok Sabha Election 2024|
साताऱ्यात उदयनराजे देखील आपला उमेदवारी अर्ज भरणार आहे. यावेळी गांधी मैदानावरूंन रॅली काढत शक्तीप्रदर्शन केले जाणार आहे. याकरिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार देखील हजर राहणार आहेत. साताऱ्यात उदयनराजे यांच्याविरोधात महाविकास आघाडीकडून शशिकांत शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे, सुनील तटकरे अलिबागला आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे.
हेही वाचा:
“निधी पाहिजे तर कचाकचा बटणं दाबा”, वादग्रस्त विधानानंतर अजित पवार स्पष्टच म्हणाले,’गंमतीने हसत हसत…’