Jalgaon Politics : जळगावमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. शरद पवार गटाचे दोन माजी मंत्री डॉ. सतीश पाटील आणि गुलाबराव देवकर लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे संकेत मिळत आहेत. माजी मंत्री डॉ. सतीश पाटील हे २ मे रोजी, तर माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या पक्षप्रवेशाचा मुहूर्त मंगळवारी होणाऱ्या एका बैठकीत ठरण्याची शक्यता आहे. Satish Patil | गुलाबराव देवकर यांच्यासोबत दोन माजी आमदार, जिल्हा बँकेच्या माजी संचालिका यांच्यासह अनेक मोठे पदाधिकारी लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. या संभाव्य राजकीय बदलामुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणे पुन्हा एकदा ढवळून निघण्याची शक्यता आहे. पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत या दोन्ही नेत्यांचा औपचारिक पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती मिळत आहे. Gulabrao Deokar | डॉ. सतीश पाटील यांनी मंगळवारी पारोळा एरंडोल तालुक्यातील कार्यकर्त्यांचीही बैठक बोलावली आहे, तर पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांच्या उपस्थितीत गुलाबराव देवकर, माजी आमदार कैलास पाटील, तिल्लोतमा पाटील यांच्यासह राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या काही पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. या बैठकीत देवकर यांच्या पक्षप्रवेशाचा मुहूर्त ठरणार असल्याची माहिती आहे. NCP Sharad Pawar | शरद पवार गटाला जळगावमध्ये अपयश लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला जळगाव जिल्ह्यात मोठ्या अपयशाला सामोरे जावे लागले होते. या पार्श्वभूमीवर पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्याने, अनेक कार्यकर्ते, सत्ताधारी गटात असणेच फायदेशीर आहे असं मानू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर पक्षांतर्गत हालचालींना वेग आल्याचे दिसत आहे. Ajit Pawar | काय म्हणाले डॉ. सतीश पाटील? याबाबत बोलताना माजी मंत्री डॉ. सतीश पाटील म्हणाले की, सध्या आम्ही विरोधात असल्याने कार्यकर्त्यांच्या समस्या मार्गी लागत नाहीत. कार्यकर्त्यांची भावना लक्षात घेऊन आणि त्यांच्याशी चर्चा करूनच पुढील निर्णय घेण्यात येणार आहे, असं ते म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यातून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. Satish Patil | जिल्ह्यात अजित पवार गटाला बळ मिळणार जिल्हाध्यक्ष संजय पवार म्हणाले की, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसाठी जिल्ह्यात अजित पवार गटाला चांगले बळ मिळणार आहे. सध्या अनेक जण पक्षात येण्यासाठी इच्छुक आहेत. जिल्ह्यातील कोणत्या नेत्यांचा प्रवेश होणार, याबाबतचा सर्व निर्णय माजी मंत्री अनिल पाटील घेणार आहेत. अजित पवारांची वेळ घेऊन प्रवेशाचा अधिकृत निर्णय घेतला जाईल, असं संजय पवार म्हणाले.