Modi government : मोठी बातमी ! ‘या’ केंद्रीय राज्यमंत्र्याचा तडकाफडकी राजीनामा, पीएम मोदींबाबत पोस्टमध्ये म्हणाले – ‘केंद्र सरकारमध्ये…’
Modi government : केंद्रीय राज्यमंत्री एल. मुरुगन यांनी मंत्रीपद आणि राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. 2029 लोकसभा निवडणुकीपूर्वी तमिळनाडूत भाजप मजबूत करण्यावर त्यांचा भर.

Modi government : केंद्रीय माहिती व प्रसारण तसेच संसदीय कामकाज राज्यमंत्री एल. मुरुगन यांनी मंत्रीपद आणि राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी दोन्ही पदांचे राजीनामे एकाच वेळी दिले आहेत.
मुरुगन हे केंद्र सरकारमध्ये राज्यमंत्री म्हणून काम करत होते. त्यांनी माहिती व प्रसारण आणि संसदीय कामकाज मंत्रालयाची जबाबदारी सांभाळली होती.
2029 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी तमिळनाडूमध्ये भाजप मजबूत करण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वरील पोस्टमध्ये मुरुगन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचे कौतुक केले. केंद्र सरकारमध्ये काम करण्याची संधी मिळणे हा आपल्यासाठी मोठा सन्मान असल्याचे त्यांनी म्हटले.
Minister of State for Information and Broadcasting and Parliamentary Affairs, L. Murugan, resigns from both his ministry and membership of the Rajya Sabha https://t.co/ZjXyP21udQ
— ANI (@ANI) October 13, 2026
आता पुन्हा पक्षाच्या कार्यकर्त्यांसोबत तळागाळात काम करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. तमिळनाडूमध्ये भाजपचा विस्तार करणे आणि 2029 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी पक्ष संघटना मजबूत करणे हे आपले प्रमुख उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.
एल. मुरुगन यांची 2021 मध्ये पहिल्यांदा राज्यसभेवर निवड झाली होती. त्यानंतर 2024 मध्ये ते दुसऱ्यांदा राज्यसभेवर निवडून आले. त्यांच्या राजीनाम्यामुळे तमिळनाडूतील राज्यसभेची एक जागा रिक्त झाली आहे.





