IREW vs SLW 2nd ODI : आयर्लंडच्या महिला संघाची ऐतिहासिक कामगिरी, श्रीलंकेविरुद्ध प्रथमच जिंकली मालिका…

IREW vs SLW 2nd ODI : श्रीलंकेचा महिला क्रिकेट संघ सध्या आयर्लंडच्या दौऱ्यावर आहे जिथे त्यांनी पहिली 2 सामन्यांची टी-20 मालिका खेळली जी 1-1 अशी बरोबरीत संपली. यानंतर आता श्रीलंकेच्या महिला संघाला 3 सामन्यांच्या वनडे मालिकेत 2-0 ने पराभवाचा सामना करावा लागला आहे. आयर्लंडच्या महिला संघाने वनडे मालिकेतील दुसरा सामना 15 धावांनी जिंकताना मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे.
आयर्लंड महिला संघाचा श्रीलंकेविरुद्धच्या कोणत्याही फॉरमॅटमधील हा पहिला मालिका विजय आहे. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात आयर्लंड संघाने प्रथम फलंदाजी करताना 5 गडी गमावून 255 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात श्रीलंकेच्या संघाला 48 षटकात सर्वबाद 240 धावसंख्येपर्यंतच मजल मारता आली.
Tough loss today against Ireland. They take the match by 15 runs and secure a 2-0 lead in the series. #IREvSL pic.twitter.com/PM7oXLzvWo
— Sri Lanka Cricket 🇱🇰 (@OfficialSLC) August 18, 2024
विजयासाठी 256 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या श्रीलंकेच्या महिला संघाची दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात चांगली सुरुवात झाली नाही ज्यात त्यांनी 4 धावांवर पहिली विकेट गमावली. यानंतर कर्णधार चमारी अटापट्टू आणि हर्षिता समरविक्रमामध्ये दुसऱ्या विकेटसाठी 42 धावांची भागीदारी पाहायला मिळाली. या सामन्यात अटापट्टू 22 धावांची इनिंग खेळून पॅव्हेलियनमध्ये परतली.
येथून हर्षिताने कविशा दिलहाराच्या साथीने डाव पुढे नेला आणि धावसंख्या 172 धावांपर्यंत नेली. यादरम्यान श्रीलंकेला सलग दोन धक्के बसले. कविशा दिलहारा 53 तर अनुष्का संजीवनी शून्यावर बाद होऊन माघारी परतली. ही भागीदारी तुटल्याने आयर्लंडच्या महिला संघाला पुनरागमनाची संधी मिळाली आणि त्यांनी त्याचे सोनं केले. यानंतर धावसंख्या 210 असताना हर्षिता समरविक्रमा 105 धावांची शानदार खेळी खेळून बाद झाली, पण ती आपल्या संघाला 15 धावांच्या पराभवापासून वाचवू शकली नाही. आयर्लंड संघाकडून गोलंदाजीत आर्लिन केलीने सर्वाधिक 3 तर जेन मॅग्वायरने 2 बळी घेतले.
Team India : मोहम्मद शमी ‘या’ स्पर्धेतून करणार पुनरागमन, तब्बल 11 महिन्यांनंतर उतरणार मैदानात….
तत्पूर्वी, जर आपण या सामन्यातील आयर्लंड महिला संघाच्या फलंदाजीच्या कामगिरीबद्दल बोललो तर त्यांची सुरुवातही चांगली झाली नाही ज्यामध्ये त्यांनी 10 धावांवर पहिली विकेटही गमावली. 134 धावसख्येंपर्यंत संघाने 4 विकेट गमावल्या होत्या. येथून लेआ पॉलने एका टोकाकडून डावाची धुरा सांभाळली ज्यामध्ये तिला रेबेका स्टोकेलची साथ मिळाली आणि पाचव्या विकेटसाठी दोघींमध्ये 100 हून अधिक धावांची भागीदारी झाली. यामुळे आयरिश संघाला 50 षटकांत 255 धावांपर्यंत मजल मारता आली. लीह पॉलने 81 धावांची तर रेबेका स्टोकेलने नाबाद 53 धावांची खेळी केली तर एमी हंटरनेही 66 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. श्रीलंकेकडून गोलंदाजीत कविशा दिल्हारी आणि अचीनी कुलसूर्या यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले तर चमारी अटापट्टू हीने एक विकेट घेतली.





