“चर्चा करणं थांबवा आणि तिला तिचं आयुष्य जगू द्या!”; स्मृती मानधनासाठी सलील कुलकर्णींचे नेटकऱ्यांना आवाहन

Salil Kulkarni | भारतीय महिला संघाची उपकर्णधार स्मती मानधना आणि म्युझिक कंपोझर पलाश मुच्छल यांचा लग्नसोहळा २३ नोव्हेंबरला पार पडणार होता. मात्र, स्मृतीच्या वडिलांची प्रकृती बिघडल्यामुळे लग्न तात्पुरता रद्द करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
पण, याचदरम्यान स्मृतीने लग्नासंदर्भातील पलाशबरोबरचे फोटो इन्स्टाग्रामवरून डिलीट केल्याने सोशल मीडियावर सध्या विविध चर्चांना उधाण आलं आहे. याबाबत आता अनेक तर्क-वितर्क लावले जात आहे. यावरून आता प्रसिद्ध गायक सलील कुलकर्णी यांनी देखील स्मृती मानधनाच्या लग्नाबाबत होणाऱ्या चर्चांवरुन नेटकऱ्यांना सुनावले आहे.
काय म्हणाले सलील कुलकर्णी?
सलील कुलकर्णी यांनी इनस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत म्हंटले की, “मित्रांनो आपण असे का वागतो? स्मृती मानधनाच्या आयुष्यात जे काही झालं असेल ते ती बघेल…तिच्या जवळची लोक बघतील. आपल्या घरातील मुलगी असती किंवा बहीण असती तर आपण असं बोललो असतो का? काय हौस आहे हे सांगण्याची की, सर्वांपेक्षा जास्त आपल्याला माहित आहे, सर्वांच्या आधी हे आपल्याला माहित आहे.”
View this post on Instagram
“आपल्याला इतकी घाई कशाला? सतत बातम्या पसरवण्याची…काहीही माहिती नसताना वाढवून सांगण्याची…हे काय आहे? आपण थोडं समजूतदारपणे वागलं पाहिजे. आपल्या घरचं कोणी असतं तर आपण असं नसतं केलं. या गोष्टी तुम्हाला आधी समजल्या तर असं काय साध्य होणारे? जरा आपआपलं बघुयात ना…” असे आवाहन त्यांनी केले आहे. Salil Kulkarni |
सलील कुलकर्णी हा व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहितात, “प्लीज, स्मृतीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल चर्चा करणं थांबवा आणि तिला तिचं आयुष्य जगू द्या!” यावर अनेकांनी कमेंट करत त्यांना पाठिंबा दिला आहे. Salil Kulkarni |
हेही वाचा:





