Shafali Fastest Fifty : शफाली वर्माने मोडला स्मृती मानधनाचा रेकॉर्ड! महिला टी-२० आशिया कपच्या फायनलमध्ये ठोकलं सर्वात वेगवान अर्धशतक
Shafali Fastest Fifty : भारतीय महिला क्रिकेट संघाची स्फोटक सलामीवीर फलंदाज शफाली वर्माने अवघ्या २४ चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण करून स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात जलद अर्धशतक झळकावले.

Shafali Verma Fastest Fifty Women Asia Cup Final Smashes Smriti Mandhana Record : महिला टी-२० आशिया चषक २०२६ (Women’s T20 Asia Cup 2026) च्या अंतिम महामुकाबल्यात भारतीय सलामीवीर शफाली वर्माने (Shafali Verma) आपल्या स्फोटक फलंदाजीने नवा इतिहास रचला आहे. श्रीलंकेविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने २० षटकांत ५ गड्यांच्या मोबदल्यात १८३ धावांचा मजबूत डोंगर उभारला. शफाली वर्मा आणि स्मृती मानधना या सलामीच्या जोडीने पहिल्या विकेटसाठी अवघ्या १२.५ षटकांत १२९ धावांची विक्रमी भागीदारी रचत संघाला भक्कम पाया रचून दिला.
२४ चेंडूंत अर्धशतक; मानधनाचा ऐतिहासिक विक्रम मोडला –
शफालीने अंतिम सामन्यात श्रीलंकेच्या गोलंदाजांची पिसं काढत अवघ्या २४ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. यासह तिने महिला टी-२० आशिया चषकाच्या इतिहासातील सर्वात जलद अर्धशतक ठोकण्याचा विश्वविक्रम आपल्या नावावर केला. विशेष म्हणजे, तिने सहकारी सलामीवीर स्मृती मानधनाचा विक्रम मोडला. मानधनाने २०२२ च्या आशिया चषक फायनलमध्ये श्रीलंकेविरुद्धच २५ चेंडूंत अर्धशतक ठोकले होते. शफालीने ३९ चेंडूंत ९ चौकार आणि २ उत्तुंग षटकारांच्या मदतीने ६८ धावांची नेत्रदीपक खेळी साकारली.
४०० चौकारांचा टप्पा पार; हरमनप्रीत आणि स्मृतीच्या पंक्तीत स्थान –
Solid foundation. Full throttle! 🫡⚡#SmritiMandhana and #ShafaliVerma set the tone in the #WomensAsiaCupFinal, laying a solid foundation for #TeamIndia! 💥#INDvSL #WomensAsiaCup pic.twitter.com/YZQXGLxCrh
— Star Sports (@StarSportsIndia) September 13, 2026
आपल्या ६८ धावांच्या वादळी खेळीदरम्यान ९ चौकार ठोकत शेफाली वर्माने महिला आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये ४०० चौकारांचा टप्पा ओलांडला. हा टप्पा गाठणारी ती भारताची तिसरी फलंदाज ठरली आहे. आता आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये सर्वाधिक चौकार मारणाऱ्या भारतीय खेळाडूंमध्ये स्मृती मानधना (६३९ चौकार) अव्वल स्थानी असून हरमनप्रीत कौर (४०८+) दुसऱ्या तर शफाली वर्मा (४०४ चौकार) तिसऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे.
टीम इंडिया जेतेपदाच्या उंबरठ्यावर –
Shafali Verma & Finals = Guaranteed Entertainment 😮💨
Watch the #DPWorldWomensAsiaCup2026 FINAL LIVE NOW on Sony Sports Network TV channels & Sony LIV.#SonySportsNetwork #SonyLIV #NotAGentlemansGame pic.twitter.com/D9K5UibPVa
— Sony Sports Network (@SonySportsNetwk) September 13, 2026
शफाली आणि मानधनाच्या (४६ धावा) शतकी सलामीच्या जोरावर भारताने धावफलकावर १८३ धावा उभारून श्रीलंकेसमोर विजयासाठी १८४ धावांचे तगडे आव्हान ठेवले आहे. दुबईच्या संथ खेळपट्टीवर हे लक्ष्य गाठणे श्रीलंकेच्या फलंदाजांसाठी अत्यंत कठीण ठरणार असून भारतीय महिला संघ विक्रमी आठव्यांदा आशिया चषकावर आपले नाव कोरण्यासाठी सज्ज झाला आहे.





