Smriti Palash Haldi : स्मृती-पलाशच्या लग्नाच्या विधींना झाली सुरुवात! हळदी समारंभातील डान्सचा VIDEO होतोय व्हायरल

Smriti Mandhana Palash Muchhal Haldi Ceremony Video Viral : भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधना आणि प्रसिद्ध संगीतकार पलाश मुच्छल लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. येत्या दोन दिवसांत, म्हणजे २३ नोव्हेंबरला स्मृती मानधना पलाशची नववधू बनेल. त्याआधी, शुक्रवारपासून त्यांच्या विवाह समारंभाला सुरुवात झाली आहे. स्मृतीच्या हळदी समारंभाचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.
स्मृती मानधनाच्या हळदी समारंभाचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये स्मृतीच्या चेहऱ्यावर लग्नाच्या आनंदाचा उत्साह स्पष्टपणे दिसत आहे. हळदीच्या समारंभादरम्यान भारतीय महिला संघातील तिच्या सहकारी खेळाडूंची आणि मैत्रिणींची धमाल मस्तीही व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.
View this post on Instagram
पलाशने पिचवर दिले अविस्मरणीय सरप्राईज –
View this post on Instagram
स्मृतीचा होणारा पती पलाश मुच्छलने नुकतेच एक मोठं आणि रोमँटिक सरप्राईज दिले होते. त्याने स्मृतीला डीवाय पाटील स्टेडियमवर नेऊन, थेट क्रिकेटच्या पिचवर गुडघे टेकून लग्नाची मागणी घातली. विशेष म्हणजे, हे तेच मैदान आहे जिथे भारतीय महिला संघाने २०२५ चा विश्वचषक जिंकला होता.
पलाशने हा खास क्षणाचा व्हिडओ शेअर करताना लिहिले होते, ‘तिने होकार दिला आहे.’ डोळ्यावरची पट्टी काढल्यावर पलाशला गुडघ्यावर बसलेला पाहून स्मृतीला झालेला आनंद तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. हा क्षण अविस्मरणीय बनवण्यासाठी त्यांचे मित्र-मैत्रिणीही पिचवर पोहोचले होते.
View this post on Instagram
सांगलीत होणार विवाह सोहळा –
भारत के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने भारतीय महिला क्रिकेट टीम की स्टार बल्लेबाज़ स्मृति मंधाना और म्यूज़िक कम्पोज़र पलाश मुच्छल को उनकी सगाई पर बधाई दी। पीएम मोदी ने उनको और उनके परिवारों को शुभकामनाएं उनके जीवन में प्यार, और विश्वास बना रहने की कामना की #SmritiMandhana #PMModi pic.twitter.com/vRmiIIzveI
— Rohini acharya (@GauravB50323081) November 21, 2025
A beautiful inside glimpse of Smriti Mandhana and Palash Muchhal’s haldi ceremony 💛
.
.
.#IndiaForums #SmritiMandhana #PalashMuchhal #HaldiCeremony pic.twitter.com/YcNEkkaiJW— India Forums (@indiaforums) November 21, 2025
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल हे दोघे २३ नोव्हेंबरला महाराष्ट्रातील सांगली या स्मृतीच्या मूळ शहरात सात फेरे घेणार आहेत. लग्नाच्या पत्रिका पलाशच्या कुटुंबीयांनी इंदूरमधील नातेवाईकांनाही वाटल्या आहेत. सांगलीत विवाह झाल्यानंतर, मनोरंजन क्षेत्रातील कलाकार आणि क्रिकेटर्ससाठी हे जोडपे मुंबईत एका शानदार रिसेप्शन पार्टीचे आयोजन करण्याची शक्यता आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही स्मृती-पलाशला पत्र पाठवून त्यांच्या लग्नासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.





