अकोल्यात किरकोळ वादातून दगडफेक; दोन-तीन जण जखमी, शहरात तणावाचे वातावरण
Updated On:

अकोला – दोन गटातील किरकोळ वादातून दगडफेक झाल्याची घटना सोमवारी रात्री वाशीम शहरातील पाटणी चौकात घडली. या घटनेचे पडसाद शहरातील इतर भागातही उमटले. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळावर धाव घेऊन परिस्थितीवर नियंत्रण प्राप्त केले.
या दगडफेकीच्या घटनेत दोन ते तीन जण किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दगडफेक प्रकरणात पोलिसांनी आरोपींची धरपकड सुरू केली असून आतापर्यंत सहा जणांना ताब्यात घेतले आहे.
वाशीम शहरातील परिस्थिती नियंत्रणात असून सध्या तणावपूर्ण शांतता आहे. कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन प्रशासनाद्वारे करण्यात आले आहे. दगडफेकीमध्ये काही दुचाकी आणि चारचाकी वाहनांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.





