Sangli News: आटपाडीत 1 कोटी 7 लाखांचा प्रतिबंधित पानमसाला व सुगंधित तंबाखूचा साठा जप्त
Sangli News: एक संशयित ताब्यात, दुसरा फरारी

सांगली – आटपाडी पोलिसांनी मोठी कारवाई करत महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला पानमसाला व सुगंधित तंबाखूचा साठा जप्त केला आहे. तडवळे- बनपुरी रस्त्यावरील बनपुरी फाटा येथे 17 जून रोजी करण्यात आलेल्या कारवाईत सुमारे 1 कोटी 7 लाख 75 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या कारवाईत विमल पानमसाल्याचे विविध प्रकारचे 29,600 पाऊच, तसेच व्ही-१ सुगंधित तंबाखूचे 28,600 पाऊच हस्तगत करण्यात आले. याशिवाय माल वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला अशोक लेलँड टेम्पो (एमएच१२ व्हीएफ ७५११) आणि इर्टिगा कार (एमएच १२ आयटी ९३०२) ही वाहनेही जप्त करण्यात आली.
या प्रकरणी भाऊसाहेब मधुकर जगताप (रा. फुरसुंगी, पुणे) याला ताब्यात घेण्यात आले असून तेजस (पूर्ण नाव अज्ञात, रा. कुंजीरवाडी, पुणे) हा संशयित फरारी झाला आहे. आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 205/2026 दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बायस करीत आहेत.
हेही वाचा:





