State Level Yogasana Competition : रिदमिका योगासन स्पर्धेत महिका पटवर्धनला ब्रॉंझ…

पुणे – शालेय राज्यस्तरीय योगासन स्पर्धेत मालपाणी फाउंडेशनच्या सूस रोड येथील ध्रुव ग्लोबल स्कूलची खेळाडू महिका पटवर्धनने रिदमिका योगासन क्रिडाप्रकारात ब्रॉंझपदक पटकावले. तीच्या या दमदार खेळाबद्दल ध्रुव ग्लोबल स्कूलचे संचालक यश मालपाणी व प्रिन्सीपल संगीता राऊतजी यांनी कौतुक करून शुभेच्छा दिल्या.
अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा येथील त्रिमूर्ती शैक्षणिक व क्रीडा संकुलामध्ये आयोजित राज्यस्तरीय योगासन स्पर्धेत महिका ने वैयक्तिक १४ वर्षाखालील मुलींमधे हे पदक पटाकाविले आहे. तसेच ध्रुव ग्लोबल स्कूलच्या अन्य खेळाडूंनी दमदार कामगिरी केली आहे. या स्पर्धेत संपूर्ण राज्यातील साडे चार हजारापेक्षा अधिक खेळाडूंनी आपल्या खेळाचे उत्कृष्ठ प्रदर्शनाचे सादरीकरण केले होते.
NZ vs SA Test Series 2024 : ‘हे’ असेच सुरु राहीले तर कसोटी क्रिकेट संपून जाईल – स्टीव्ह वॉ
ही स्पर्धा १४, १७ आणि १९ वयोगटातील राज्यस्तरातील मुले व मुलींमध्ये संपन्न झाली होती. महिका पटवर्धनला या खेळाची आवड जोपासण्यासाठी कृतीशील प्रशिक्षक गायत्री वारे व वैष्णवी आंद्रे यांनी प्रशिक्षण दिले.





