Paris Olympics 2024 (Wrestling) : अमन सेहरावतला सेमीफायनलमध्ये पराभवाचा धक्का,आता कांस्यपदकासाठी खेळणार…

Paris Olympics 2024 (Aman Sehrawat ,Wrestling,Men’s Freestyle 57 Kg ) : पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताने आतापर्यंत फक्त 4 कांस्यपदके जिंकली आहेत आणि यातील तिन पदके नेमबाजीत जिंकली आहेत तर एक पदक आजच हाॅकीमध्ये मिळालेले आहे. भारतीय हॉकी संघाने पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये कांस्यपदकाच्या लढतीत स्पेनचा 2-1 असा पराभव केला. यासह भारतीय संघाने सलग दुसऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकले आहे. याआधी संघानं टोकियो ऑलिम्पिक गेम्समध्येही कांस्यपदक जिंकले होते.
दुसरीकडे कुस्तीमधून भारतासाठी निराशादायक बातमी समोर आली आहे. भारतीय कुस्तीपटू अमन सेहरावतने दमदार कामगिरी करताना सलग दोन विजय नोंदवत सेमीफायनलमध्ये (उपांत्य फेरी) धडक मारली होती. मात्र सेमीफायनलमध्ये अमन सेहरावतला 10-0 असा पराभवाचा धक्का बसला आहे.
सेमीफायनलमध्ये हिगुची रे’कडून पराभूत…
भारताच्या अमन सेहरावतला 57 किलो फ्रीस्टाइल कुस्ती प्रकारात उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागला. तांत्रिक श्रेष्ठतेवर त्याला जपानच्या अव्वल मानांकित ‘हिगुची रे’ याने पराभूत केले. पहिल्या फेरीत म्हणजे तीन मिनिटांपेक्षा कमी वेळेत, जपानी कुस्तीपटूने अमनचा पराभव केला आणि 10 गुण मिळवले आणि तांत्रिक श्रेष्ठतेवर विजय मिळवत अंतिम फेरीत धडक मारली आहे.
🇮🇳 Result Update: Men’s Freestyle #Wrestling🤼 57KG👇
Tough luck for Aman Sehrawat 💔
The 21-year-old, who had put up impressive performances in the Round of 16 & Quarter-Finals lost to No. 1 seed Higuchi Rei by 0-10.
Aman will play for Bronze tomorrow against Puerto Rico’s… pic.twitter.com/KHjQTsHEtk
— SAI Media (@Media_SAI) August 8, 2024
आता कांस्यपदक जिंकण्याची संधी…
आता हिगुची अंतिम फेरीत पोहोचल्याने अमनला कांस्यपदक जिंकण्याची संधी असेल. तो कांस्यपदकासाठी स्पर्धा करेल. कांस्यपदकासाठीची लढत 9 ऑगस्ट रोजी रात्री 10.45 वाजता होईल. त्याचा कांस्यपदासाठीचा सामना पोर्तो रिकोचा कुस्तीपटू डॅरियन टोई क्रूझशी होईल.
सलग दोन विजयासह केली होती आगेकूच…
तत्पूर्वी, अमन सेहरवतने पुरुषांच्या 57 किलो गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत अल्बेनियाच्या अबाकारोव्ह झेलीमखानचा पराभव केला होता. अमनने हा सामना 12-0 ने जिंकला होता. त्याआधी, अमन सेहरावत याने 57 किलो वजनी गटाच्या उप-उपांत्यपूर्व फेरीत आपला प्रतिस्पर्धी मॅसेडोनियाचा कुस्तीपटू व्लादिमीर एगोरोव्हला पराभूत करत उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली होती. या लढतीत अमन सेहरावतने तांत्रिक श्रेष्ठतेवर व्लादिमीर एगोरोव्हचा 10-0 असा पराभव केला होता.





