Paris Paralympics 2024 : धावपटू दीप्ती जीवनजीने पटकावले कांस्यपदक…

Paris Paralympics 2024 (Women’s 400m T20 final) : पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये भारतीय खेळाडूंची स्फोटक कामगिरी कायम आहे. जागतिक चॅम्पियनशिप सुवर्णपदक विजेती भारताची महिला धावपटू दीप्ती जीवनजीने (Deepthi Jeevanji) पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये महिलांच्या 400 मीटर T20 अॅथलेटिक्स स्पर्धेत 55.82 सेकंद वेळेसह कांस्यपदक जिंकले आहे. अंतिम फेरीत ती तिसऱ्या स्थानावर राहिली. दिप्तीच्या कांस्यपदकासह भारताची पदक संख्या 16 वर पोहचली आहे.
युक्रेनच्या युलिया शुल्यार हिने 55.16 सेकंद वेळेसह सुवर्ण तर विश्वविक्रम धारक तुर्कीची आयसेल ओंडर हिने 55.23 सेकंद वेळेसह रौप्यपदक पटकावले. टी20 (T20) श्रेणी बौद्धिकदृष्ट्या कमकुवत खेळाडूंसाठी आहे.
Deepthi delivers #Bronze🥉🎉
Para #WorldChampion Deepthi Jeevanji clinches her first #Paralympic medal🎖️, bagging a #Bronze🥉 with a timing of 55.82 seconds in Women’s 400m T20 final.
With this win, she became the 2nd Indian women track athlete to clinch a medal at the… pic.twitter.com/s5PGG2DaYn
— SAI Media (@Media_SAI) September 3, 2024
तुर्कीच्या खेळाडूने मोडला होता दीप्तीचा विश्वविक्रम…
20 वर्षीय दीप्ती या वर्षाच्या सुरुवातीला कोबे येथे 55.07 सेकंदांच्या विश्वविक्रमासह जागतिक चॅम्पियनशिप जिंकल्यानंतर पॅरिसला आली होती. 2023 च्या हँगझोऊ आशियाई क्रीडा स्पर्धेतही तिने 56.69 सेकंद वेळेसह सुवर्णपदक जिंकले होते. मात्र, 2 सप्टेंबर रोजी हीट 2 मध्ये अंतिम फेरीसाठी पात्र ठरताना दीप्तीचा विश्वविक्रम तुर्कीच्या आयसेल ओंडर हिने मोडित काढला. त्यावेळी ओंडर हिने 54.96 सेकंदाची वेळ नोंदवत विश्वविक्रम आपल्या नावावर केला.
Paris Paralympics 2024 : भारताची युवा शटलर ‘नित्या सिवन’ची कांस्यपदकाला गवसणी….
पंतप्रधान मोदींनी केले दीप्तीचे अभिनंदन…
कांस्य पदक जिंकल्याबद्दल धावपटू दीप्ती जीवनजी हिचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अभिनंदन केले. तिच्या कौशल्य आणि दृढ निर्धाराचे कौतुक करत मोदी यांनी एक्स वर पोस्ट केले आहे की, “ पॅरालिम्पिक 2024 मध्ये महिलांच्या 400 मीटर T20 प्रकारात नेत्रदीपक कांस्यपदक पटकावल्याबद्दल दीप्ती जीवनजी हिचे अभिनंदन! असंख्य लोकांसाठी ती प्रेरणास्त्रोत आहे. तिचे कौशल्य आणि दृढ निर्धार वाखाणण्याजोगा आहे.”





