Nagar | आमदार जगतापांची पाच वर्षात 1 कोटी 98 लाखांनी संपत्तीमध्ये वाढ

नगर, (प्रतिनिधी)- विधानसभेच्या अहमदनगर शहर मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांनी गुरुवारी गुरुपृष्यामृतच्या मुहूर्तावर उमेदवारी अर्ज जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर पाटील यांच्याकडे दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल करतांना त्यांनी शपथपत्रात जंगम व स्थावर मालमत्ता 10 कोटी 61 लाख 54 हजार 820 रुपये असल्याचे जाहीर केले आहे.
तर पत्नी शितल जगताप तीन कोटी 67 लाख 47 हजार 128 रुपये एवढी जाहीर केली आहे. या पाच वर्षात आ. संग्राम जगताप यांच्या संपत्तीमध्ये एक कोटी 98 लाख 55 हजार 477 रुपयांनी वाढ झाली आहे. तर पत्नी शितल जगताप यांची दोन कोटी 58 लाख 94 हजार 92 रुपयांनी वाढली आहे.
आ. जगताप यांनी यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. या उमेदवारी अर्जबरोबर त्यांनी शपथपत्र दाखल केले असून त्यात आपली संपत्ती जाहीर केली आहे. आ. जगताप यांची जंगम मालमत्ता सन 2019 मध्ये 2 कोटी 22 लाख 36 हजार 816 रुपये होती. ती आता सन 2024 मध्ये 3 कोटी 10 लाख 93 हजार 518 एवढी झाली आहे.
त्यांच्याकडे दोन वाहने आहेत. तर 100 गँ्रम सोने आहे. त्याची किमत 7 लाख 75 हजार 630 रुपये आहे. पत्नी शितल जगताप यांच्याकडे सन 2019 मध्ये 45 लाख 82 हजार 962 जंगम मालमत्ता होती. ती आता सन 2024 मध्ये 1 कोटी 58 लाख 49 हजार 18 झाली आहे. त्यांच्याकडे पाच वाहने असून 300.37 ग्रॅम सोने आहे. त्याची किमत 26 लाख 1 हजार 230 रुपये आहे.
स्थावर मालमत्तेमध्ये आ. जगताप यांच्याकडे सन 2019 मध्ये 6 कोटी 40 लाख 62 हजार 527 रुपये मालमत्ता होती. ती आता पाच वर्षानंतर 7 कोटी 50 हजार 61 हजार 302 झाली आहे. पाच वर्षीत 1 कोटी 9 लाख 99 हजार 45 रुपयांनी वाढ झाली आहे.
पत्नी शितल यांच्याकडे सन 2019 मध्ये 62 लाख 70 हजार 74 मालमत्ता होती. ती आता 2 कोटी 8 लाख 98 हजार 110 एवढी झाली आहे. या सपंत्तीमध्ये आ. जगताप यांची 1 कोटी 98 लाख 55 हजार 477 रुपयांनी तर शितल जगताप यांची 2 कोटी 58 लाख 94 हजार 92 रुपयांनी वाढली आहे.
आ. जगताप यांच्यावर 2 कोटी 11 लाख 21 हजार 750 रुपये कर्ज आहे. तर पत्नीच्या नावावर 1 कोटी 48 लाख 89 हजार 911 एवढे कर्ज आहे. या शपथपत्रात त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचे गुन्हे दाखल नाही. त्यांनी येळील न्यु आर्टस् महाविद्यालयात बी. कॉम शिक्षण 2009 मध्ये केले आहे.





