KL Rahul Injury : रिटायर्ड हर्ट झालेल्या केएल राहुलबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर! फलंदाजी प्रशिक्षक म्हणाले…
KL Rahul Injury : पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर भारतीय संघाचे फलंदाजी प्रशिक्षक सितांशु कोटक यांनी राहुलच्या दुखापतीवर अत्यंत महत्त्वाचे अपडेट दिली आहे.

KL Rahul Cramps Injury Update Sitanshu Kotak Devdutt Padikkal Century : श्रीलंकेविरुद्ध गॉल आंतरराष्ट्रीय मैदानावर सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी उत्कृष्ट फलंदाजी करत असलेला केएल राहुल (KL Rahul) अचानक ‘रिटायर्ड हर्ट’ होऊन मैदानाबाहेर गेला. ज्यामुळे भारतीय चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर भारतीय संघाचे फलंदाजी प्रशिक्षक सितांशु कोटक (Sitanshu Kotak) यांनी राहुलच्या दुखापतीवर अत्यंत महत्त्वाचे अपडेट देऊन सर्वांना मोठा दिलासा दिला आहे. राहुलला केवळ स्नायूंचा ताण (Cramps) आणि डिहायड्रेशनचा त्रास झाला असून त्याची प्रकृती आता उत्तम असल्याचे कोटक यांनी स्पष्ट केले आहे.
दमट हवामान अन् डिहायड्रेशनमुळे राहुल मैदानाबाहेर –
सामन्यात १६२ चेंडूंत ७७ धावांची संयमी खेळी केल्यानंतर गॉलमधील प्रचंड उष्णता, दमट हवामान आणि डिहायड्रेशनमुळे राहुलला स्नायूंच्या तीव्र वेदना जाणवू लागल्या. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून तिसऱ्या सत्राच्या सुरुवातीलाच त्याला मैदान सोडावे लागले. फलंदाजी प्रशिक्षक सितांशु कोटक यांनी सांगितले की, राहुलची तब्येत आता पूर्णपणे नियंत्रणात असून कोणतीही गंभीर दुखापत नाही. तो लवकरच पुन्हा फलंदाजीसाठी मैदानात उतरू शकतो.
पडिक्कलच्या नाबाद १३१ धावा; दोन वर्षांच्या मेहनतीचे फळ –
It’s only cramps and KL Rahul looks good to go tomorrow, touchwood if he stays fine: Batting coach Sitanshu Kotak on vice-captain retiring hurt on 77 pic.twitter.com/MNWJH84mUg
— Press Trust of India (@PTI_News) August 15, 2026
पहिल्या दिवसाचे मुख्य आकर्षण ठरला तो युवा फलंदाज देवदत्त पडिक्कलचे (Devdutt Padikkal) पहिलेवहिले कसोटी शतक! कसोटी संघात पुनरागमन करत पडिक्कलने नाबाद १३१ धावांची वादळी खेळी साकारली. सितांशु कोटक यांनी पडिक्कलच्या चिकाटीचे तोंडभरून कौतुक केले. “गेल्या दोन वर्षांत पडिक्कलने देशांतर्गत क्रिकेटमध्ये घेतलेल्या अपार कष्टांचे हे फळ आहे. त्याने स्थानिक परिस्थितीशी जुळवून घेत श्रीलंकेच्या फिरकी माऱ्याला पूर्णपणे निष्प्रभ केले,” असे कोटक म्हणाले.
राहुल-पडिक्कलची १५० धावांची भागीदारी; भारत २ बाद २८८
A worrying moment in Galle. 😟💔
KL Rahul has retired hurt after struggling with an issue in his right-hand finger, along with severe cramps.
He was seen receiving treatment before walking back to the dressing room. Hoping it’s nothing serious and KL is back soon. 🙏❤️
📸:… pic.twitter.com/Q8w6XdHuwx
— CricTracker (@Cricketracker) August 15, 2026
यशस्वी जैस्वालच्या दुर्दैवी धावचितनंतर पडिक्कल आणि राहुल यांनी दुसऱ्या विकेटसाठी १५० धावांची अभेद्य शतकीय भागीदारी रचून भारताला मजबूत स्थितीत आणले. कर्णधार शुबमन गिल प्रभात जयसूर्याच्या फिरकीवर बाद झाला, तरीही पहिल्या दिवसअखेर भारताने २ गड्यांच्या मोबदल्यात २८८ धावांपर्यंत मजल मारली आहे. सध्या देवदत्त पडिक्कल (१३१*) आणि यष्टीरक्षक ऋषभ पंत (२७*) नाबाद असून दुसऱ्या दिवशी भारतीय संघ मोठी आघाडी घेण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल.





