Shreyanka Patil Video : श्रेयंका पाटीलचा ‘बबली बदमाश है’ वर भन्नाट डान्स; ट्रोल करणाऱ्यांना दिले सडेतोड प्रत्युत्तर
भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार फिरकीपटू श्रेयंका पाटील (Shreyanka Patil Video) जेव्हा हातात चेंडू घेऊन 22 यार्डांच्या खेळपट्टीवर उतरते, तेव्हा तिचे संपूर्ण लक्ष केवळ प्रतिस्पर्ध्याची दांडी उडवण्यावर असते.

Shreyanka Patil Video : भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार फिरकीपटू श्रेयंका पाटील (Shreyanka Patil Video) जेव्हा हातात चेंडू घेऊन 22 यार्डांच्या खेळपट्टीवर उतरते, तेव्हा तिचे संपूर्ण लक्ष केवळ प्रतिस्पर्ध्याची दांडी उडवण्यावर असते.
फलंदाजांना आपल्या जादुई फिरकीने चकवणारी आणि अत्यंत आक्रमक भासणारी हीच २४ वर्षीय खेळाडू (Shreyanka Patil Video) जेव्हा क्रिकेटचे मैदान सोडून कॅमेऱ्यासमोर येते, तेव्हा तिचा पूर्णपणे वेगळा आणि थक्क करणारा अंदाज पाहायला मिळतो.
सोशल मीडियावर सध्या श्रेयंकाचा (Shreyanka Patil Video) एक ग्लॅमरस डान्स व्हिडिओ तुफान धुमाकूळ घालत आहे. २०१३ मधील ‘शूटआउट ॲट वडाला’ या चित्रपटातील सुनिधी चौहानच्या आवाजातील आणि अनु मलिक यांनी संगीतबद्ध केलेल्या प्रियांका चोप्राच्या गाजलेल्या ‘बबली बदमाश है’ या गाण्यावर तिने जबरदस्त ताल धरला आहे.
व्यावसायिक नृत्यांगनेलाही लाजवेल असा आत्मविश्वास, खोडकर हावभाव आणि बिनधास्त डान्स मूव्ह्स दाखवत तिने चाहत्यांना अक्षरशः वेड लावले आहे. ‘जस्ट बीइंग अ बदमाश’ अशा कॅप्शनसह शेअर केलेला हा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर चर्चेचा विषय ठरला आहे.
View this post on Instagram
काही नेटकऱ्यांनी या व्हिडिओवरून श्रेयंकाला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला असता, तिनेही मैदानाप्रमाणेच सोशल मीडियावरही सडेतोड उत्तर दिले. आपल्या भावना व्यक्त करताना ती म्हणाली की, एका डान्स व्हिडिओचा एवढा मोठा मुद्दा का बनवला जातोय हेच मला समजत नाही.
डान्स हा तिचा जुना आणि आवडीचा छंद असून क्रिकेटपटू असल्यामुळे नृत्याचा आनंद घेण्यावर कोणतेही बंधन असू नये, असे तिने ठामपणे मांडले. केवळ डान्स करण्यावरून ट्रोल करणाऱ्यांवर निशाणा साधत तिने म्हटले की, अशा टीकेमुळे खेळाडूपेक्षा टीकाकारांची संकुचित विचारसरणीच उघडी पडते. तिच्या या धाडसी भूमिकेचे आणि ग्लॅमरस अंदाजाचे सध्या सर्वत्र भरभरून कौतुक होत आहे.






