Sri Lanka Cricket : आयसीसीची ‘या’ युवा फिरकीपटूवर कडक कारवाई, घातली एका वर्षाची बंदी; समोर आलं ‘हे’ कारण….

ICC bans Sri Lankan cricketer : आपल्या शानदार कामगिरीने सर्वांना आश्चर्यचकित करणाऱ्या श्रीलंकेच्या क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. आयसीसी (ICC) म्हणजेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने संघाचा युवा खेळाडू आणि फिरकीपटू प्रवीण जयविक्रमावर बंदी घातली आहे. ही बंदी एक वर्षासाठी असेल आणि या काळात तो कोणत्याही आंतरराष्ट्रीय सामन्यात सहभागी होऊ शकणार नाही.
वास्तविक, आयसीसीने श्रीलंकेचा डावखुरा फिरकी गोलंदाज प्रवीण जयविक्रमावर भ्रष्टाचारविरोधी संहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी एका वर्षाची बंदी घातली आहे. या काळात तो 6 महिन्यांसाठी निलंबित राहणार आहे. जयविक्रमाने आयसीसीच्या भ्रष्टाचार विरोधी संहितेचे उल्लंघन केल्याची कबुली दिल्यानंतर त्याच्यावर ही बंदी घालण्यात आली आहे. जयविक्रमाने संहितेच्या अनुच्छेद 2.4.7 चे उल्लंघन केल्याचे मान्य केले आहे.
A Sri Lanka bowler has been banned for a year under the ICC Anti-Corruption Code.https://t.co/QpWA1r3hCN
— ICC (@ICC) October 2, 2024
दरम्यान, जयविक्रमावरील आरोप आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि लंका प्रीमियर लीगशी संबंधित आहेत आणि आयसीसीने श्रीलंका क्रिकेट (SLC) सोबत केलेल्या करारातील भ्रष्टाचार विरोधी संहितेच्या कलम 1.7.4.1 आणि 1.8.1 नुसार कारवाई केली आहे.
अनुच्छेद 2.4.7 चे उल्लंघन म्हणजे काय ?
अनुच्छेद 2.4.7 चे उल्लंघन म्हणजे लाचलुचपत प्रतिबंधक युनिटद्वारे केल्या जात असलेल्या कोणत्याही तपासात अडथळा आणणे किंवा विलंब करणे, ज्यात दस्तऐवज किंवा इतर माहिती लपवणे, छेडछाड करणे किंवा नष्ट करणे याचा समावेश आहे, जे त्या तपासाशी संबंधित असू शकते आणि/किंवा जे पुरावे असू शकतात किंवा भ्रष्टाचार विरोधी संहिता अंतर्गत भ्रष्ट वर्तनाचे पुरावे शोधून काढू शकतात.
Women’s T20 World Cup 2024 : बांगलादेशची विजयी सलामी, स्कॉटलंडचा 16 धावांनी केला पराभव…
जयविक्रमाची कारकिर्द…
जयविक्रमा 2022 मध्ये श्रीलंकेकडून शेवटचा खेळला होता. त्याने पाच कसोटी, पाच एकदिवसीय आणि अनेक टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भाग घेतला आहे. या 15 सामन्यांमध्ये त्याने एकूण 32 विकेट घेतल्या आहेत. प्रवीणने लंका प्रीमियर लीगमध्ये 2021 आणि 2022 मध्ये जाफना किंग्ससाठी आणि अगदी अलीकडे 2023 मध्ये डंबुला सिक्सर्ससाठी प्रतिनिधित्व केले आहे .





