Asia Cup 2025 : आशिया कपसाठी श्रीलंकेचा संघ जाहीर; चरिथ असलंका करणार नेतृत्व!

वानिंदु हसरंगाला संधी, फिटनेसवर अवलंबून खेळ –
श्रीलंकेने जाहीर केलेल्या संघात अनुभवी फिरकी गोलंदाज वानिंदु हसरंगाला स्थान मिळाले आहे. मात्र, तो सध्या हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीतून पूर्णपणे सावरलेला नाही. जुलै २०२५ मध्ये बांगलादेशविरुद्धच्या टी-२० मालिकेदरम्यान त्याला ही दुखापत झाली होती. त्यामुळे हसरंगा पूर्णपणे तंदुरुस्त झाल्यासच त्याला खेळण्याची संधी मिळेल.
Here’s a look at Sri Lanka’s potential strongest XI for the Asia Cup! 💪🇱🇰
Can this lineup deliver the ultimate triumph? 🏆#SriLanka #Cricket #AsiaCup2025 #Sportskeeda pic.twitter.com/dCqq3Tmfh0
— Sportskeeda (@Sportskeeda) August 28, 2025
संघातील इतर खेळाडूंबाबत बोलायचे झाले तर, सलामीला कुसल मेंडिस आणि पथुम निसांका यांच्यावर अवलंबून असेल, तर अष्टपैलू खेळाडूंमध्ये माजी कर्णधार दासुन शनाका, कामेंदु मेंडिस, दुनिथ वेल्लागे आणि कर्णधार चरिथ असलंका यांचा समावेश आहे.
हेही वाचा – Sanju Samson : संजू सॅमसनचा कहर! पाच दिवसात साकारली तिसरी वादळी खेळी, सूर्या-गंभीरची वाढली डोकेदुखी
श्रीलंका ग्रुप-बी मध्ये –
आशिया चषक २०२५ मध्ये श्रीलंका संघाला ग्रुप-बी मध्ये स्थान मिळाले आहे. या गटात अफगानिस्तान, बांगलादेश आणि हाँगकाँग यांचा समावेश आहे. श्रीलंका आपला पहिला सामना १३ सप्टेंबरला बांगलादेशविरुद्ध खेळेल, तर १५ सप्टेंबरला हाँगकाँगविरुद्ध आणि १८ सप्टेंबरला अफगानिस्तानविरुद्ध ग्रुप-बी मधील शेवटचा सामना खेळेल. श्रीलंकेच्या या संतुलित संघाकडून यंदाच्या आशिया चषकातही दमदार कामगिरीची अपेक्षा आहे. सर्वांचे लक्ष त्यांच्या पहिल्या सामन्याकडे लागले आहे.
आशिया चषक २०२५ साठी श्रीलंका संघ –
चरिथ असलंका (कर्णधार), कुसल मेंडिस (यष्टीरक्षक), पथुम निसांका, कुसल परेरा, कामिल मिशारा, दासुन शनाका, कामेंदु मेंडिस, वानिंदु हसरंगा, नुवानिदु फर्नांडो, दुनिथ वेल्लागे, चामिका करुणारत्ने, महीश तीक्ष्णा, मथीशा पथिराना, नुवान तुषारा, दुष्मंथा चमीरा, बिनूरा फर्नांडो.





