Salman Agha : पाकिस्तानची अब्रू पुन्हा चव्हाट्यावर, कर्णधार सलमान आघाचा पडला चेहरा, नेमकं कारण काय? पाहा VIDEO

राशिद खानला विचारलेल्या प्रश्नाने पाकिस्तानची झाली चेष्टा –
पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने अफगाणिस्तानचा कर्णधार राशिद खानला विचारले की, या तिरंगी मालिकेतील त्यांचे उद्दिष्ट काय आहे, कारण टी-२० प्रकारात अफगाणिस्तान आशियातील दुसरा सर्वोत्तम संघ बनला आहे. हा प्रश्न थेट पाकिस्तानच्या क्रिकेटमधील घसरणीकडे बोट दाखवणारा होता. एकेकाळी आशियाई क्रिकेटमधील बलाढ्य संघांपैकी एक मानला जाणारा पाकिस्तानचा दबदबा आता राहिलेला नाही. या प्रश्नातून ती वस्तुस्थिती स्पष्ट झाली.
Salman Ali Agha made a face and smirked when a reporter called the Afghanistan team the second-best team in Asia pic.twitter.com/vZzfYTUS2b
— Thakur (@hassam_sajjad) August 28, 2025
नाराज चेहरा कॅमेऱ्यात झााला कैद –
पाकिस्तान संघाचा कर्णधार सलमान आघाला हा प्रश्न अजिबात आवडला नाही आणि त्याचा नाराज चेहरा कॅमेऱ्यात कैद झाला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्याची चेष्टाही केली जात आहे. कारण पाकिस्तान क्रिकेट संघाची सध्याची कामगिरी निराशाजनक आहे. गेल्या वर्षी टी-२० विश्वचषकात पाकिस्तानला गट फेरीतच बाहेर पडावे लागले होते, जिथे त्यांना अमेरिकेसारख्या नवख्या संघाकडूनही पराभव पत्करावा लागला. याशिवाय, काही महिन्यांपूर्वी आयर्लंडविरुद्धच्या टी-२० सामन्यातही त्यांना अनपेक्षित पराभवाचा सामना करावा लागला.
या वर्षी न्यूझीलंड दौऱ्यावर पाकिस्तानला टी-२० मालिकेत १-४ अशी दारुण हार पत्करावी लागली. त्यानंतर त्यांनी बांगलादेशला ३-० ने पराभूत केले, पण त्याच बांगलादेशविरुद्ध नंतरच्या मालिकेत १-२ अशी हार पत्करली. अलीकडेच सलमान आघाच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानने वेस्ट इंडिजला टी-२० मालिकेत पराभूत केले असले, तरी चाहते आणि तज्ज्ञांचा संघावर विश्वास कमीच आहे.
हेही वाचा – Sanju Samson : संजू सॅमसनचा कहर! पाच दिवसात साकारली तिसरी वादळी खेळी, सूर्या-गंभीरची वाढली डोकेदुखी
संघ व्यवस्थापनातील अस्थिरता –
पाकिस्तान क्रिकेट संघाची कामगिरी गेल्या काही वर्षांत सातत्याने घसरत आहे. वारंवार कर्णधार आणि प्रशिक्षक बदलले गेले, तरीही द्विपक्षीय मालिका आणि मोठ्या स्पर्धांमध्ये संघाला यश मिळवता आलेले नाही. २०२२ च्या टी-२० विश्वचषकात उपविजेता ठरलेला पाकिस्तान त्यानंतरच्या २७ टी-२० सामन्यांपैकी केवळ ९ सामन्यांत विजय मिळवू शकला, त्यापैकी ६ विजय हे तुलनेने कमकुवत संघांविरुद्ध (हाँगकाँग, आयर्लंड आणि कमकुवत न्यूझीलंड संघ) मिळवले होते.





