IPL 2024 (SRH vs RCB Match 41) : रनमशीन कोहलीने रचला नवा इतिहास, आयपीएलमध्ये ‘अशी’ कामगिरी करणारा ठरला पहिला खेळाडू….

SRH vs RCB, Virat Kohli created history : आयपीएल 2024 च्या 41 व्या सामन्यात आज सनरायझर्स हैदराबादचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी होत आहे. हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या या सामन्यात आरसीबीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर म्हणून मैदानात आलेल्या विराट कोहलीने 21 धावा करताच इतिहास रचला. 21 धावा केल्यानंतर त्याने या मोसमात 400 धावा पूर्ण केल्या. यासह, 10 हंगामात 400 हून अधिक धावा करणारा तो IPL इतिहासातील पहिला फलंदाज ठरला आहे. यापूर्वी सुरेश रैनाने 9 हंगामात ही कामगिरी केली होती. दरम्यान आजच्या सामन्यात कोहलीने 43 चेंडूत 51 धावांची खेळी केली असून या हंगामात त्याच्या 430 धावा झाल्या आहे. त्यामुळे त्याच्याकडे ऑरेंज कॅप कायम राहणार आहे. आजच्या खेळीदरम्यान त्याने 4 चौकार आणि 1 षटकार लगावला. जयदेव उनाडकटने त्याला आपला बळी बनवले.
विराटच्या 10 हंगामातील 400 हून धावांची माहिती….
आयपीएल 2011 मध्ये 557 धावा
आयपीएल 2013 मध्ये 634 धावा
आयपीएल 2015 मध्ये 505 धावा
आयपीएल 2016 मध्ये 973 धावा
आयपीएल 2018 मध्ये 530 धावा
आयपीएल 2019 मध्ये 464 धावा
आयपीएल 2020 मध्ये 466 धावा
आयपीएल 2021 मध्ये 405 धावा
आयपीएल 2023 मध्ये 639 धावा
आयपीएल 2024 मध्ये 430* धावा
आणखी एक टप्पा गाठला…
याशिवाय विराट कोहलीने आणखी एक कामगिरी आपल्या नावावर केली आहे. आयपीएलमध्ये सलामीवीर म्हणून त्याने 4000 धावाही पूर्ण केल्या आहेत. यासह तो आयपीएलमध्ये 4000 धावा करणारा चौथा सलामीवीर ठरला आहे. यापूर्वी शिखर धवन, डेव्हिड वॉर्नर आणि ख्रिस गेल यांनी ही कामगिरी केली होती.
World Record : ‘या’ क्रिकेटपटूने केला विश्वविक्रम, एकही धाव खर्च ‘न’ करता घेतल्या 7 विकेट…
आयपीएलमध्ये सलामीवीर म्हणून सर्वाधिक धावा
6362 धावा – शिखर धवन (202 डाव)
5909 धावा- डेविड वार्नर (162 डाव)
4480 धावा- क्रिस गेल (122 डाव)
4041 धावा- विराट कोहली (107 डाव)
3965 धावा – केएल राहुल (93 डाव)
2016 मध्ये केल्या होत्या विक्रमी धावा…
इंडियन प्रीमियर लीगच्या एकाच मोसमात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही विराट कोहलीच्या नावावर आहे. 2016 मध्ये कोहलीने 16 सामन्यात 81.08 च्या उत्कृष्ट सरासरीने 973 धावा केल्या होत्या. त्या मोसमात विराटने 7 अर्धशतके आणि 4 शतकी खेळी केली होती. IPL 2016 देखील स्ट्राइक रेटच्या बाबतीत विराट कोहलीसाठी सर्वोत्तम ठरला. इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासात ही पहिलीच वेळ होती, जेव्हा कोहलीने संपूर्ण हंगामात 150 पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने फलंदाजी केली.





