SRH vs PBKS : ट्रॅव्हिस हेड-ग्लेन मॅक्सवेल मैदानात भिडले, व्हायरल VIDEO ने सोशल मीडियावर खळबळ

SRH vs PBKS Travis Head and Glenn Maxwell fight video viral : आयपीएल २०२५ चा २७ वा सामना हैदराबाद आणि पंजाब यांच्यात १२ एप्रिल रोजी संध्याकाळी खेळला गेला. या मोठ्या धावसंख्येच्या सामन्यात, प्रथम पंजाब किंग्जने कर्णधार श्रेयस अय्यर आणि स्टॉइनिस यांच्या शानदार खेळीच्या जोरावर २४५ धावांचा डोंगर उभारला होता. प्रत्युत्तरात अभिषेक आणि ट्रॅव्हिस यांच्या स्फोटक खेळींच्या जोरावर हैदराबादने हे लक्ष्य ९ चेंडू शिल्लक असताना गाठले. सामन्यादरम्यान ऑस्ट्रेलियन सलामीवीर ट्रॅव्हिस हेड आणि ग्लेन मॅक्सवेल यांच्यात जोरदार वाद झाला. ज्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
सामन्यादरम्यान ट्रॅव्हिस आणि ग्लेन भिडले –
१२ एप्रिल रोजी आयपीएल २०२५ मध्ये उत्साहाचा तिसरा बूस्टर डोस पाहायला मिळाला. हैदराबाद आणि पंजाब यांच्यात झालेल्या सामन्यात बरेच चौकार, षटकार आणि धावा झाल्या आणि त्याच वेळी वादही शिगेला पोहोचला. सामन्यादरम्यान ऑस्ट्रेलियाचे दोन स्टार खेळाडू एकमेकांशी भांडताना दिसले. त्यांच्यातील जोरदार वादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Heat moment between Glenn Maxwell and Travis Head.
📸: @StarSportsIndia | #SRHvPBKS pic.twitter.com/bjPnOPyhms
— King Steve (@ash_cric) April 12, 2025
खरं तर, हैदराबादच्या डावाच्या ९व्या षटकाच्या तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर, ट्रॅव्हिस हेडने सलग दोन षटकार मारून ग्लेन मॅक्सवेलला डिवचलं. त्यानंतर ग्लेन मॅक्सवेलने लगेच कमबॅक केले आणि शेवटचे दोन चेंडू डॉट टाकले. यादरम्यान, षटक संपल्यानंतर, मॅक्सवेलने रागाने चेंडू हेडकडे फेकला. त्यानंतर त्याचा संयम सुटला. दोघांमध्ये जोरदार वाद झाला. परंतु, मार्कस स्टॉइनिस आणि पंचांनी हस्तक्षेप करून दोघांनाही शांत केले. या घटनेचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.
हेही वाचा – DC vs MI सामन्यापूर्वी मैदानात अनोख्या प्राण्याची एन्ट्री! पाहून खेळाडूंसह समालोचकही घाबरले
मात्र, हेड आणि अभिषेक यांनी पहिल्या षटकापासून पंजाबच्या गोलंदाजांची धुलाई केले. या दोघांनी पहिल्या विकेट्ससाठी केलेल्या १७१ धावांच्या भागीदारीमुळे हैदराबादला सामना जिंकण्यास मदत झाली. हेडने ३७ चेंडूत ६६ धावांचे योगदान दिले आणि अभिषेक शर्माने ५५ चेंडूत १४१ धावांचे योगदान दिले.





