SRH vs MI : पंच विनोद सेशनच्या निर्णयांवर चाहते संतप्त; मुंबईच्या बाजूने निर्णय दिल्याने फिक्सिंगचा आरोप?

SRH vs MI Allegations of fixing Ishan Kishan and Umpire Vinod Seshan : आयपीएल २०२५ चा अर्धा हंगाम नुकताच संपला आहे. दरम्यान, अचानक मॅच फिक्सिंगसारखे गंभीर आरोप होऊ लागले आहेत. खरंतर, सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामन्यात इशान किशनला बाद देण्यावरुन बराच गोंधळ उडाला आहे. कारण त्याला कोणतेही अपील केले नसताना पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले.
चाहत्यांकडून फिक्सिंग केल्याचा आरोप –
यानंतर स्निको मीटरने दाखवले की चेंडू त्याच्या बॅटला स्पर्श करत नव्हता आणि तो वाइड होता. सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे मुख्य पंच विनोद सेशन यांनीही त्याला थांबवले नाही. ज्यामुळे त्यांच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून फिक्सिंगचे आरोप होत आहेत. या सामन्यातील पंच विनोद सेशनही निर्णय देण्याआधी काही सेकंद गोंधळलेले दिसले. कारण झेलबादची अपील केले नसतानाही डावखुरा फलंदाज इशान किशन हा बाद झालाय असं समजून क्रीझ सोडण्याचा विचार करत होता.
🚨 Umpiring Scandal in IPL 2025! 🤬
Vinod Seshan, what’s going on? All 3 decisions favoring MI—suspicious much? 🧐
• LBW call on RCB: Ball pitched OUTSIDE OFF, still OUT! 😡
• Ishan Kishan’s dismissal: No appeal, UltraEdge says NOT OUT, yet he walks? 🥴
• Seshan raising…
— CRICKET 18 LOVER (@Cricket_18_love) April 24, 2025
त्यावेळी त्याचे हावभाव पंच विनोद सेशन यांनी बाद घोषित केले. आता चाहते विनोद सेशनवर गंभीर आरोप करत आहेत. त्याने असा प्रश्न उपस्थित केला आहे की मुंबई इंडियन्सच्या बाजूने गेलेला प्रत्येक चुकीचा निर्णय फक्त त्यांच्याशीच का जोडला जात आहे? इशान किशन वादानंतर, अनेक चाहत्यांनी सोशल मीडियावर विनोद सेशनच्या पंचगिरीबद्दल प्रश्न उपस्थित केले आहेत.
हेही वाचा – Pahalgam Attack : भारताचा पाकिस्तानला मोठा दणका! PSL 2025 च्या प्रसारणावर घातली बंदी
पंच विनोद सेशनचे ३ वादग्रस्त निर्णय चर्चेत –
It is suspicious, how these all 3 decisions gone in MI’s favour & The Common link is on field umpire “VINOD SESHAN”#MIvsSRH #RohitSharma #ViratKohli #KLRahul #IPL2025 #MSDhoni #RCB #CSK #MI pic.twitter.com/QyVli44vkl
— Monish (@Monish09cric) April 24, 2025
चाहत्यांनी म्हटले आहे की आतापर्यंत असे ३ निर्णय आले आहेत, जे चुकीचे होते आणि मुंबईच्या बाजूने होते. विशेष म्हणजे या तिन्ही वेळा मुख्य पंच विनोद सेशन होते. हा फक्त योगायोग आहे की दुसऱ्या कशाकडे इशारा करत आहे? याचा अर्थ असा की, दबक्या आवाजात पंच विनोद सेन आणि मुंबई इंडियन्सवर फिक्सिंगचा आरोप करण्याचा प्रयत्न करत आहे.
It is suspicious, how these all 3 decisions gone in MI’s favour & The Common link is on field umpire “VINOD SESHAN” pic.twitter.com/0bdRZIo9a5
— Fearless🦁 (@ViratTheLegend) April 23, 2025
चाहत्यांच्या मते, पहिला निर्णय रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध पाहिला गेला. जेव्हा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर पिच झाला होता तरीही विनोद सेशनने आरसीबीच्या फलंदाजाला एलबीडब्ल्यू कॉलवर बाद दिले होते. मात्र, रिव्ह्यू घेतल्यानंतर निर्णय बदलण्यात आला होता. यानंतर, दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध, त्यांनी रोहित शर्माला एलबीडब्ल्यू अपीलवर नाबाद घोषित केले होते.
हेही वाचा – SRH vs MI : अपील केले नसताना ‘आऊट’ देणे योग्य का? एमसीसीचा नियम काय सांगतो? जाणून घ्या
या वेळी चेंडूचा इम्पॅक्ट आणि पिचींग दोन्ही रेषेत होते. यावेळीही केएल राहुलने रिव्ह्यू घेतला आणि निर्णय बदलण्यास भाग पाडले. आता तिसरे प्रकरण इशान किशनचे होते, जेव्हा त्याच्या विकेटबद्दल मुंबईच्या कोणत्याही खेळाडूने अपील करता हात वर केले आणि त्यानंतर दीपकने सहज अपील केल्यानंतर इशानला बाद घोषित केले. हे सर्व आरोप चाहत्यांकडून केले जात आहेत, याबाबत सोशल मीडियावर पोस्टही व्हायरल होत आहेत. आम्ही यामध्ये काहीही दावा करत नाही.





