Pahalgam Attack : भारताचा पाकिस्तानला मोठा दणका! PSL 2025 च्या प्रसारणावर घातली बंदी

PSL 2025 broadcast banned in India after Pahalgam terror attack : पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला. या घटनेच्या निषेधार्थ भारत सरकारने पाकिस्तानविरोधात कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. या घटनेनंतर भारताने पाकिस्तानच्या काही डिजिटल आणि प्रसारमाध्यमांवर निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला. यामध्ये पाकिस्तान सुपर लीग (PSL) २०२५ च्या भारतातील प्रसारणावर बंदी घालण्याचा समावेश आहे. जो पाकिस्तानसाठी मोठा झटका आहे.
पीएसएलच्या भारतातील प्रसारणावर बंदी –
ही बंदी राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आणि सार्वजनिक भावनांचा विचार करून लागू करण्यात आली आहे. पाकिस्तान सुपर लीग (PSL) ही पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) आयोजित टी-२० क्रिकेट स्पर्धा आहे. या स्पर्धेचे भारतातील लाइव्ह प्रसारण आणि ऑनलाइन स्ट्रीमिंगवर सरकारने बंदी घातली आहे. यामागचे कारण म्हणजे भारत-पाकिस्तानमधील वाढता राजनैतिक तणाव आणि दहशतवादी हल्ल्याला प्रतिसाद म्हणून पाकिस्तानशी संबंधित सांस्कृतिक आणि क्रीडा प्रसारण रोखणे.
🚨 NO PSL BROADCAST IN INDIA 🚨
Fancode will stop streaming PSL 2025 from today after the incident in Pahalgam. ❌ pic.twitter.com/Sjr66vaXmW
— Johns. (@CricCrazyJohns) April 24, 2025
भारताचा पीसीबीला दणका –
🚨 NO PSL TELECAST IN INDIA 🚨
– FanCode ने PSL (Pakistan Super League) का प्रसारण आज से भारत में किया बंद।
पहलगाम में अ।तंकी हमले के बाद FanCode ने लिया फैसला। pic.twitter.com/I1TCc12vpv
— Apurva Singh (@iSinghApurva) April 24, 2025
आता बंदी घातल्यामुळे पीसीबीला आंतरराष्ट्रीय प्रसारणातून मिळणारा नफा कमी होऊ शकतो, कारण भारत ही क्रिकेटसाठी मोठी बाजारपेठ म्हणून ओळखली जातो. त्यामुळे आता त्यांना पीएसएलच्या प्रसारणातून मिळणारा महसूल, विशेषतः भारतीय बाजारपेठेतून, कमी होईल. फॅनकोड आणि इतर स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्सना याचा फटका बसू शकतो. तसेच पीएसएल आणि संबंधित प्रसारण कंपन्यांना आर्थिक नुकसान होऊ शकते.
हेही वाचा – SRH vs MI : अपील केले नसताना ‘आऊट’ देणे योग्य का? एमसीसीचा नियम काय सांगतो? जाणून घ्या
पाकिस्तान सुपर लीग (PSL) ही पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) आयोजित टी-२० क्रिकेट स्पर्धा आहे. या स्पर्धेचे भारतातील लाइव्ह प्रसारण आणि ऑनलाइन स्ट्रीमिंगवर सरकारने बंदी घातली आहे. यामागचे कारण म्हणजे भारत-पाकिस्तानमधील वाढता राजनैतिक तणाव आणि दहशतवादी हल्ल्याला प्रतिसाद म्हणून पाकिस्तानशी संबंधित सांस्कृतिक आणि क्रीडा प्रसारण रोखणे.
हेही वाचा – गौतम गंभीरला जीवे मारण्याची धमकी; ‘आयसिस काश्मीर’ने पाठवले ई-मेल्स
कोणत्या ठिकाणी व्हायचे प्रसारण?
यापूर्वी पीएसएलचे सामने भारतात फॅनकोड अॅप आणि वेबसाइटवर लाइव्ह स्ट्रीम केले जात होते, तर काही वेळा सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर प्रसारण होत असे. आता भारतात पीएसएलच २०२५ चे कोणतेही सामने टीव्ही चॅनेल्स, अॅप्स किंवा वेबसाइट्सवर उपलब्ध होणार नाहीत. यामुळे भारतीय क्रिकेट चाहत्यांना ही स्पर्धा पाहण्यासाठी अनधिकृत मार्गांचा अवलंब करावा लागू शकतो, जे कायदेशीरदृष्ट्या जोखमीचे आहे.





