SRH vs LSG : लखनौने तगड्या हैदराबादचा धुव्वा उडवत उघडले विजयाचे खाते, शार्दुल ठाकूर ठरला विजयाचा शिल्पकार

SRH vs LSG Lucknow Super Giants beat Sunrisers Hyderabad by 5 Wickets : आयपीएल २०२५ ची सुरुवात विजयाने करणाऱ्या सनरायझर्स हैदराबाद संघाला पुढच्याच सामन्यात पराभवाचा मोठा धक्का बसला आहे. हैदराबादला लखनौ सुपरजायंट्सकडून पराभव पत्करावा लागला आहे, ज्यांनी त्यांना त्यांच्याच घरच्या मैदानावर पराभूत केले. प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने २० षटकांत १९० धावा केल्या होत्या, प्रत्युत्तरात लखनौला जिंकण्यात फारशी अडचण आली नाही आणि त्यांनी १६.१ पाच गडी गमावून विजयावर शिक्कामोर्तब केला. लखनौच्या विजायाचा नाय चार विकेट्स घेणारा शार्दुल ठाकूर ठरला.
शार्दुल ठाकूरने हैदराबादच्या डावाला लावल सुरुंग –
लखनौचा कर्णधार ऋषभ पंतने नाणेफेक जिंकून हैदराबादला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. हैदराबादबद्दल असे म्हटले जात होते की ते ३०० धावाही करू शकते पण शार्दुल ठाकूरने त्यांचे सर्व गैरसमज दूर केले. त्याच्या दुसऱ्या षटकात, ठाकूरने अभिषेक शर्मा आणि नंतर इशान किशन यांना सलग दोन चेंडूंवर बाद करून लखनौला चांगली सुरुवात दिली. तथापि, ट्रॅव्हिस हेडने काही आक्रमक शॉट्स खेळले, अनेक षटकार मारले आणि हैदराबादला पॉवरप्लेमध्ये ६२ धावा करण्यात यश आले.
प्रिन्स यादवने ट्रॅव्हिस हेडच्या दांड्या केल्या गुल –
Hyderabad conquered ✅
Win secured ✅#LSG get their first 𝐖 of #TATAIPL 2025 with a comfortable victory over #SRH 💙Scorecard ▶ https://t.co/X6vyVEvxwz#SRHvLSG | @LucknowIPL pic.twitter.com/7lI4DESvQx
— IndianPremierLeague (@IPL) March 27, 2025
पण हेड बाद झाल्यानंतर सगळं बदललं. ४७ धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर प्रिन्स यादवने हेडला बाद केल्यानंतर हैदराबादला धक्का बसला. रेड्डीने ३२ धावा केल्या. क्लासेन दुर्दैवाने २६ धावांवर धावचीत झाला. अनिकेत वर्माने निश्चितच १३ चेंडूत ५ षटकारांच्या मदतीने ३६ धावा केल्या पण हैदराबाद संघाला फक्त १९० धावांपर्यंतच मजल मारता आली. लोक हैदराबादच्या फलंदाजीबद्दल खूप बोलतात पण कदाचित सगळेच लखनौच्या फलंदाजांना विसरले असतील. पण मिचेल मार्श आणि निकोलस पूरन यांनी दाखवून दिले की ते देखील स्फोटक फलंदाज आहेत. मार्करम लवकर बाद झाल्यानंतर दोन्ही फलंदाजांनी हैदराबादी गोलंदाजांना झोडपले. पूरनने फक्त १८ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले जे या हंगामातील सर्वात जलद अर्धशतक ठरले.
हेही वाचा – SRH vs LSG : हेनरिक क्लासेन ठरला दुर्दैवी! कोणाचीही चूक नसताना ‘असा’ झाला रनआऊट, पाहा VIDEO
मिचेल आणि निकोलसने साकारली शतकी भागीदारी –
मार्शसह पूरनने फक्त १९ चेंडूत पन्नास धावा जोडल्या. दोघांनीही फक्त ३७ चेंडूत शतकी भागीदारी केली. लखनौच्या संघाने फक्त ७.३ षटकांत १०० धावांचा टप्पा गाठला, जिथून हैदराबादचा पराभव निश्चित होता. मिचेल मार्शनेही २९ चेंडूत अर्धशतक झळकावले. लखनौकडून पूरनने २६ चेंडूत ७० धावा केल्या. मार्शने ३१ चेंडूत ५२ धावांची खेळी केली. शेवटी संघाने पाच विकेट्सने विजय मिळवला. अशाप्रकारे लखनौने पॉइंट्स टेबलमध्ये आपले खाते उघडले आहे.





