#IPL2022 #SRHvLSG | राहुलची कॅप्टन इनिंग, हैदराबादसमोर 170 धावांचे लक्ष्य

मुंबई – लखनौ सुपरजायंट्सने सनरायझर्स हैदराबादसमोर 170 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. कर्णधारपदाची खेळी खेळताना केएल राहुलने 50 चेंडूंत सहा चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 68 धावा केल्या. त्याचवेळी दीपक हुडानेही 33 चेंडूत 51 धावांची खेळी केली. या दोघांच्या खेळीमुळे लखनौने 20 षटकांत सात गडी गमावून 169 धावा केल्या.
नाणेफेक हारल्यानंतर फलंदाजीचा निर्णय घेतलेल्या लखनौ संघाची सुरुवात खराब झाली. धावसंख्या 16 असताना संघाने क्विंटन डी कॉक (1) आणि एविन लुईस (1) यांच्या विकेट्स गमावल्या होत्या. वॉशिंग्टन सुंदरने दोघांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. यानंतर रोमॅरियो शेफर्डने मनीष पांडेलाही (11) बाद केले. लखनौने 27 धावांत तीन विकेट गमावल्या होत्या. त्यानंतर केएल राहुल आणि दीपक हुड्डा यांनी डावाची धुरा सांभाळली. राहुल आणि त्याने चौथ्या विकेटसाठी 87 धावांची भागीदारी केली.
टी नटराजनने 19व्या षटकात लखनौ सुपरजायंट्सला दोन धक्के दिले. त्याने षटकाच्या पहिल्याच चेंडूवर कर्णधार केएल राहुल पायचीत(LBW) केले. आणि राहुलची कर्णधारपदाची खेळी संपुष्टात आली. यानंतर चौथ्या चेंडूवर नटराजनने कृणाल पांड्याला शानदार यॉर्करवर क्लीन बोल्ड केले. क्रुणालला तीन चेंडूत सहा धावा करता आल्या. हैदराबादकडून टी नटराजन, वॉशिंग्टन सुंदर आणि रोमॅरियो शेफर्ड यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.





