Abhishek Sharma Record : अभिषेक शर्माने नकोशा यादीत रोहित-सॅमसनची केली बरोबरी, तब्बल सहावेळा पाहायला ‘हा’ दिवस
Abhishek Sharma Record : या सामन्यात अवघ्या २ चेंडूंत शून्यावर बाद झाल्याने अभिषेकच्या नावावर एका नकोशा विक्रमाची नोंद झाली आहे.

Abhishek Sharma Most Ducks Record 2026 : आयपीएल २०२६ च्या १० व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद आणि लखनौ यांच्यातील लढतीत सलामीवीर अभिषेक शर्मा पुन्हा एकदा अपयशी ठरला आहे. या सामन्यात अवघ्या २ चेंडूंत शून्यावर (डक) बाद झाल्याने अभिषेकच्या नावावर एका नकोशा विक्रमाची नोंद झाली असून, त्याने थेट रोहित शर्मा आणि संजू सॅमसनच्या यादीत स्थान मिळवले आहे.
आतापर्यंत ६ वेळा डकवर बाद –
सनरायझर्स हैदराबादचा धडाकेबाज फलंदाज अभिषेक शर्मासाठी २०२६ हे वर्ष कमालीचे चढ-उतारांचे ठरत आहे. लखनौविरुद्धच्या सामन्यात खातेही न उघडता धावबाद झाल्यामुळे, एका कॅलेंडर वर्षात टी-२० फॉरमॅटमध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत तो संयुक्तपणे पहिल्या स्थानी पोहोचला आहे. अभिषेक या वर्षात आतापर्यंत ६ वेळा डकवर बाद झाला आहे.
रोहित-संजूच्या विक्रमाशी केली बरोबरी –
Sunrisers Hyderabad vs Lucknow Super Giants, 10th Match, Live Update
Most T20 ducks by the Indians in a calendar year:
6 – Rohit Sharma 2018
6 – Sanju Samson 2024
6 – Abhishek Sharma 2026#AbhishekSharma #SRHvsLSG pic.twitter.com/Z6JVVseugJ
— MK Sharma ✍️ (@EmediaManoj) April 5, 2026
यापूर्वी २०१८ मध्ये रोहित शर्मा ६ वेळा शून्यावर बाद झाला होता, तर २०२४ मध्ये संजू सॅमसननेही हीच कामगिरी केली होती. आता अभिषेक शर्माने या दोघांची बरोबरी केली आहे. २०२६ मध्ये अभिषेक न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत दोनदा, टी-२० विश्वचषकात तीनदा आणि आता आयपीएलमध्ये एकदा अशा एकूण ६ वेळा शून्यावर बाद झाला आहे. पुढच्या सामन्यातही जर तो शून्यावर बाद झाला, तर तो रोहित आणि संजूला मागे टाकून या नकोशा यादीत अव्वल स्थानी जाईल.
क्लासेन आणि नितीश रेड्डीने सावरला हैदराबादचा डाव –
अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हिस हेड स्वस्तात बाद झाल्यानंतर हैदराबादची अवस्था ४ बाद २६ अशी दयनीय झाली होती. मात्र, त्यानंतर नितीश रेड्डी (५६ धावा) आणि हेनरिक क्लासेन (६२ धावा) यांनी ५ व्या विकेटसाठी ११६ धावांची भागीदारी करत संघाला सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली. हैदराबादने २० षटकांत ९ बाद १५६ धावा केल्या. लखनौच्या गोलंदाजांनी, विशेषतः मोहम्मद शमीने सुरुवातीला जो तडाखा दिला होता, त्यातून क्लासेनच्या अर्धशतकामुळे हैदराबादला सावरता आले.





