SRH vs LSG : हात जोडले अन्…वाकून केला नमस्कार! संजीव गोयंकांनी शार्दुल ठाकूरला असा ठोकला सलाम, VIDEO व्हायरल

SRH vs LSG Sanjiv Goenka Salute and Hug Thakur : आयपीएल २०२५ च्या ८ व्या सामन्यात, सनरायझर्स हैदराबादचा लखनौ सुपरजायंट्सने पाच विकेट्सने पराभव केला. या विजयाचे नायक शार्दुल ठाकूर आणि निकोलस पूरन होते. पूरनने २६ चेंडूत ७० धावा केल्या तर शार्दुलने ३४ धावा देत चार विकेट्स घेतले. या विजयानंतर संघाचे मालक संजीव गोयंका देखील खूप आनंदी दिसत होते. विजयानंतर त्याने खेळाडूंना मिठी मारली. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे शार्दुल ठाकूरला मिठी मारण्यापूर्वी त्याने वाकून नमस्कार केला. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावरल व्हायरल होत आहे.
३३ हजार कोटींच्या मालकाने शार्दुलला केला सलाम-
विशेष म्हणजे, २०२५ च्या आयपीएल लिलावात शार्दुल अनसोल्ड राहिला होता. यानंतर एलएसजीच्या गोलंदाजी युनिटमध्ये काही खेळाडूंच्या दुखापतींमुळे शेवटच्या क्षणी त्याला संघात सामील करण्यात आले. दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या पहिल्या सामन्यात दोन विकेट्स घेतल्यानंतर, त्याने हैदराबादमध्येही आपली उत्कृष्ट कामगिरी कायम ठेवली. सामन्यानंतर, एलएसजीचे संघाचे मालक संजीव गोयंका, ज्यांची एकूण संपत्ती ३३ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. त्यांनी शार्दुलसमोर नतमस्तक होऊन त्याला आदर दिला आणि मिठी मारली.
Our Chairman, Dr. Sanjiv Goenka, extends heartfelt congratulations to the team on their first win, and encourages to focus on giving the best 💙 pic.twitter.com/9ckEd6J6MF
— Lucknow Super Giants (@LucknowIPL) March 28, 2025
शार्दुल ठाकीरची २ कोटी रुपयांची बेस प्राईस असूनही लिलावात कोणताही खरेदीदार न मिळाल्याने, शार्दुलने एसेक्सकडून काउंटी चॅम्पियनशिप खेळण्याची तयारी सुरू केली. पण नशिबाने काही वेगळेच ठरवले होते. मोहसिन खानला एसीएल दुखापत झाल्यानंतर एलएसजीने शार्दुलची निवड केली. हा निर्णय संघाचे मार्गदर्शक झहीर खान यांनी घेतला होता, ज्यामुळे या अनुभवी अष्टपैलू खेळाडूसाठी एक नवीन अध्याय सुरू झाला.
हेही वाचा – SRH vs LSG : पॅट कमिन्सने रचला इतिहास! आयपीएलमध्ये ‘हा’ खास पराक्रम करणारा ठरला चौथाच खेळाडू
सध्या शार्दुलकडे आहे पर्पल कॅप –
या हंगामातील फक्त दोन सामन्यांमध्ये, शार्दुल पर्पल कॅपचा दावेदार ठरला. ज्यामध्ये तो ८.८३ च्या इकॉनॉमी रेटने सहा विकेट्स घेऊन सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानावर आहे. इतर फ्रँचायझींनीही त्याच्यात रस दाखवला असला तरी, एलएसजीने पहिले पाऊल उचलले, जे आता एक मास्टरस्ट्रोक असल्याचे सिद्ध होत आहे. शार्दुलचा हा प्रवास सिद्ध करतो की क्रिकेटमध्ये कधीही हार मानू नये. जो खेळाडू लिलावात कोणीलाही नको होता, तो आज प्रत्येक संघाला आपल्याकडे हवा होता, असे वाटतं आहे.





