SRH vs LSG : अनसोल्ड राहिलेल्या शार्दुल ठाकूरचा कहर! एकाच षटकात अभिषेक-इशानला दाखवला तंबूचा, VIDEO होतोय व्हायरल

SRH vs LSG Shardul Thakur dismissed Abhishek Sharma and Ishan Kishan : इंडियन प्रीमियर लीग २०२५ च्या ७ व्या सामन्यात, लखनौ सुपरजायंट्सचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरने कहर केला. शार्दुल ठाकूरने फक्त ८ चेंडूत अनेक षटकार मारणाऱ्या अभिषेक शर्माला बाद केले. शार्दुलने प्रथम अभिषेकची विकेट घेतली आणि त्यानंतर त्याने इशान किशनची विकेटही घेतली. ठाकूरने या दोन्ही फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवत लखनौला दमदार सुरुवात करुन दिली. ज्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
शार्दुल ठाकूरने निकोलस पूरनच्या गोलंदाजीवर अभिषेक शर्माला बाद केले. त्याने अभिषेक शर्माला एक शॉर्ट बॉल टाकला आणि डीप स्क्वेअर लेगवर उभ्या असलेल्या पूरनने एक सोपा झेल घेतला. पहिल्याच चेंडूपासून शार्दुल ठाकूरविरुद्ध अभिषेक शर्माला आरामदायी वाटत नव्हता. अभिषेकनंतर, शार्दुल ठाकूरने इशान किशनलाही लगेच दुसऱ्या चेडूंवर बाद केले. इशान किशनने शार्दुल ठाकूरचा चेंडू लेग साईडच्या बाहेर जाणाऱ्या चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला आणि चेंडू थेट यष्टीरक्षक पंतच्या हातात गेला. परिणामी, गेल्या सामन्यात शतक झळकावणारा इशान किशन पहिल्याच चेंडूवर बाद झाला.
SHARDUL STRIKES! 🔥
The dangerous #AbhishekSharma falls into the trap as he gets caught at fine leg off #ShardulThakur’s clever delivery!
Watch LIVE action: https://t.co/f9h0ie1eiG #IPLonJioStar 👉 #SRHvLSG | LIVE NOW on Star Sports 1, Star Sports 1 Hindi & JioHotstar! pic.twitter.com/hx4H3wO2EN
— Star Sports (@StarSportsIndia) March 27, 2025
हैदराबादचा पॉवरप्ले संथ राहिला –
इशान किशन आणि अभिषेक शर्मा एका पाठोपाठ बाद झाल्यामुळे हैदराबादला मोठा धक्का बसला. ज्यामुळे हैदराबादला पॉवर प्लेमध्ये फक्त ६२ धावा करता आल्या. या धावा जास्त असल्या तरी हैदराबाद संघ ज्यासाठी ओळखला जातो, त्या दृष्टीने या धावा कमीच आहेत. हैदराबादच्या ६२ धावांच्या पॉवर प्लेमध्ये ट्रॅव्हिस हेडने ४२ धावा केल्या. एकंदरीत, हैदराबादच्या वादळी फलंदाजीला काही प्रमाणात रोखण्यात लखनौ संघ यशस्वी ठरला.
शार्दुलने दिल्लीविरुद्धही सोडली होती आपली छाप –
आयपीएल २०२५ च्या लिलावात अनसोल्ड राहिलेल्या शार्दुल ठाकूरने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध शानदार गोलंदाजी केली होती. त्याने डावाच्या पहिल्याच षटकात जॅक फ्रेझर मॅकगर्क आणि अभिषेक पोरेल यांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले होते. फ्रेझरला शार्दुलने फक्त एका धावेवर बाद केले, तर अभिषेकला शार्दुलने त्याचे खाते उघडण्याची संधीही दिली नाही. आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावात त्याने त्याची मूळ किंमत २ कोटी रुपये ठेवली होती, परंतु त्याला कोणताही खरेदीदार मिळाला नाही. परंतु, मोहसीन खान तंदुरुस्त नसल्याने, लखनौ सुपर जायंट्सने शार्दुलला त्यांच्या संघात समाविष्ट केले आहे.





