SRH vs GT : शुबमनने विराटची विकेट घेणाऱ्याला प्लेइंग इलेव्हनमधून दिला डच्चू, ‘या’ खेळाडूला दिली संधी

SRH vs GT Washington Sundar replace Arshad Khan : आयपीएल २०२५ मध्ये, शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्सने खराब सुरुवातीनंतर जोरदार पुनरागमन केले आहे. पहिला सामना गमावल्यानंतर, टायटन्सने पुढील दोन सामन्यांमध्ये दमदार विजय मिळवले. पण तिसऱ्या सामन्यात संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या खेळाडूला कर्णधार शुबमनने पुढच्या सामन्यातून वगळले. या मागचे कारण काय आहे? जाणून घेऊया.
विराटची विकेट घेणाऱ्याला डच्चू –
या हंगामातील गुजरात टायटन्सचा चौथा सामना सनरायझर्स हैदराबादविरुद्ध खेळला जात आहे. या सामन्यात शुबमन गिलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यासाठी गुजरातने प्लेइंग इलेव्हनमध्ये फक्त एक बदल केला आणि गेल्या सामन्यात विराट कोहलीची विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला वगळले.
अर्शदच्या जागी वॉशिंग्टनला मिळाली संधी –
Dream Wicket #ArshadKhan#ViratKohli #ipltickets #RCBvsGT pic.twitter.com/6V91C9Igzl
— Goverdhan Salvi (@GoverdhanSalvi8) April 3, 2025
हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या सामन्यात गुजरातचा कर्णधार शुभमन गिलने नाणेफेकीनंतर प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल जाहीर करताच सर्वांना आश्चर्यचकित केले. शुबमन गिल म्हणाला की, या सामन्यासाठी आमच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये एक बदल केला आहे. युवा वेगवान गोलंदाज अर्शद खानच्या जागी अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरला संधी दिली आहे. सुंदरला या हंगामात पहिल्यांदाच संधी मिळाली असली तरी, गेल्या सामन्यात प्रभावी कामगिरी करणाऱ्या अर्शदला वगळण्याचा निर्णय आश्चर्यकारक आहे.
हेही वाचा – PBKS vs RR : पंजाबला हरवणाऱ्या राजस्थानच्या खेळाडूला प्रीती झिंटाने मारली मिठी, VIDEO होतोय व्हायरल
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन :
गुजरात टायटन्स : शुबमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, जोस बटलर (यष्टीरक्षक), राहुल तेवतिया, शाहरुख खान, रशीद खान, वॉशिंग्टन सुंदर, आर साई किशोर, मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा आणि इशांत शर्मा.
हेही वाचा – Khushdil Shah Fight : ‘…तर त्याने बॅटनं मारलं असतं’, खुशदिल शाहच्या भांडणावर बासित अलीचं मोठं वक्तव्य
सनरायझर्स हैदराबाद : पॅट कमिन्स (कर्णधार), ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, इशान किशन, नितीश कुमार रेड्डी, हेनरिक क्लासेन (यष्टीरक्षक), अनिकेत वर्मा, कामिंदू मेंडिस, झीशान अन्सारी, जयदेव उनाडकट आणि मोहम्मद शमी.





