Rashid Khan number 1 bowler for Gujarat : IPL 2024 च्या 12 व्या सामन्यात गुजरात टायटन्सने सनरायझर्स हैदराबादला त्यांच्या घरच्या मैदानावर पराभूत करून विजय मिळवला. आयपीएलच्या चालू हंगामात गुजरात टायटन्सला दुसरा विजय मिळाला आहे. या सामन्यात गुजरातने हैदराबादचा ७ गडी राखून पराभव केला. गुजरात संघाचा फिरकी गोलंदाज राशिद खानने या सामन्यात मोठी कामगिरी केली. राशिद खान हा गुजरात टायटन्सकडून सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे. यावेळी त्याने मोहम्मद शमीचा विक्रम मोडला, ज्याने गेल्या मोसमात एकूण २८ बळी घेतले होते, मात्र दुखापतीमुळे शमी या हंगामात खेळत नाही. | Rashid Khan number 1 bowler for Gujarat राशिद खान GT साठी सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज राशिद खान गुजरात टायटन्ससाठी सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला. राशिदच्या खात्यात ४९ विकेट जमा आहेत. त्याने गुजरातकडून 48 बळी घेणाऱ्या मोहम्मद शमीला मागे टाकले. अहमदाबादच्या मैदानावर सनरायझर्स हैदराबादविरुद्ध राशिदने चार षटकांत ३३ धावा देत एक बळी घेतला. राशिदने 14 व्या षटकात हेनरिक क्लासेनला बोल्ड केले. क्लासेनने 13 चेंडूत 24 धावांची खेळी खेळली. या काळात क्लासेनला केवळ 24 धावा करता आल्या. | Rashid Khan number 1 bowler for Gujarat GT साठी आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक विकेट घेणार गोलंदाज राशिद खान – 49 विकेट्स मोहम्मद शमी- 48 विकेट्स मोहित शर्मा- 33 विकेट्स नूर अहमद- 17 विकेट्स अल्झारी जोसेफ- 14 विकेट्स