Sreesanth Wife Statement : ‘मोदी-क्लार्कला लाज वाटायला हवी…’, श्रीसंतची पत्नी भुवनेश्वरी का संतापली, नेमकं कारण काय?

Sreesanth Wife Bhuvneshwari on Lalit Modi ans Michael Clarke : क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे, कारण २००८ मधील आयपीएलच्या पहिल्या हंगामातील हरभजन सिंग-श्रीसंत ‘थप्पड़ कांड’चा व्हिडीओ १७ वर्षांनंतर समोर आला आहे. आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदीने हा व्हिडीओ ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू मायकेल क्लार्कच्या पॉडकास्टवर बोलताना जारी केला. मोदीने दावा केला की, त्याच्याकडे या वादग्रस्त घटनेचा अस्सल फुटेज आहे, जो टीव्हीवर कधीच प्रसारित झाला नव्हता. या घटनेमुळे पुन्हा एकदा वाद निर्माण झाला असून, श्रीसंतची पत्नी भुवनेश्वरीने यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
ललित मोदी-मायकेल क्लार्कला लाज वाटायला हवी –
भुवनेश्वरीने इन्स्टाग्राम स्टोरीवर लिहिले, “ललित मोदी आणि मायकेल क्लार्क, तुम्हाला लाज वाटायला हवी! केवळ स्वस्तातील प्रसिद्धी आणि व्ह्यूजसाठी तुम्ही २००८ च्या घटनेला उकरून काढत आहात. श्रीसंत आणि हरभजन दोघेही यातून पुढे गेले आहेत. आता ते शाळेत जाणाऱ्या मुलांचे वडील आहेत. तरीही तुम्ही त्यांना जुन्या जखमांमध्ये पुन्हा ओढण्याचा प्रयत्न करत आहात. हे अत्यंत घृणास्पद, क्रूर आणि अमानवीय आहे.” तिने पुढे सांगितले की, या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबावर गंभीर परिणाम झाला आहे.
पुन्हा पाहणे आमच्या कुटुंबासाठी अत्यंत वेदनादायी –
🚨 Big Statement from Sreesanth’s wife!
Bhuvneshwari lashes out at Lalit Modi & Michael Clarke for reopening the 2008 wound 💔#cricket #sreesanth #HarbhajanSingh pic.twitter.com/K51Eo7JZm4
— CricInformer (@CricInformer) August 30, 2025
भुवनेश्वरी पुढे म्हणाली, “श्रीसंतने प्रत्येक आव्हानाला सामोरे जाऊन सन्मान आणि शालीनतेने आपले जीवन पुन्हा उभे केले आहे. त्याची पत्नी आणि मुलांची आई म्हणून, १८ वर्षांनंतर ही घटना पुन्हा पाहणे आमच्या कुटुंबासाठी अत्यंत वेदनादायी आहे. केवळ व्ह्यूज मिळवण्यासाठी कुटुंबांना त्या आघाताला पुन्हा सामोरे जावे लागत आहे, जो दशकांपूर्वी मिटला होता. यामुळे केवळ खेळाडूंनाच नव्हे, तर त्यांच्या निरागस मुलांनाही जखम होत आहेत, ज्यांना आता कोणत्याही चुकीशिवाय प्रश्न आणि लज्जास्पद परिस्थितीला तोंड द्यावे लागत आहे.”
हेही वाचा – MS Dhoni : बीसीसीआय गंभीर-धोनी यांना एकत्र आणणार? माहीला टीम इंडियामध्ये मिळू शकते ‘ही’ महत्त्वाची जबाबदारी
केव्हा झाला होता?
One of the wildest moments in IPL history, Unseen footage of the Bhajji–Sreesanth slapgate that never been aired#IPL pic.twitter.com/E9Ux8bodOW
— Vishal (@Fanpointofviews) August 29, 2025
ही घटना २००८ मध्ये मोहाली येथे किंग्ज इलेव्हन पंजाब (आता पंजाब किंग्स) आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामन्यादरम्यान घडली होती. पंजाबच्या विजयानंतर वाद निर्माण झाला आणि मुंबईचा कार्यवाहक कर्णधार हरभजन सिंग याने सामन्यानंतरच्या भांडणात किंग्ज इलेव्हन पंजाबचा वेगवान गोलंदाज श्रीसंत याला कानशिलात लगावली होती.
या वादानंतर हरभजन सिंगला उर्वरित हंगामासाठी निलंबित करण्यात आले आणि त्याच्यावर दंडही ठोठावण्यात आला. मात्र, काही वर्षांनंतर दोन्ही खेळाडूंनी समेट केला होता. तरीही, ललित मोदीने आता हा व्हिडीओ जारी करून पुन्हा वाद उकरून काढला आहे. त्याने दावा केला आहे की, त्याच्या सुरक्षा कॅमेऱ्यांनी ते सर्व काही टिपले होते, जे टेलीव्हिजन कॅमेऱ्यांना टिपता आले नव्हते.





