Sreeleela : श्रीलीलाचा बॅालिवूड डेब्यू ठरला! सैफ अली खानच्या मुलासोबत अॅानस्क्रिन झळकणार? मोठी अपडेट समोर
Sreeleela : परिणामी श्रीलीलाचे त्या चित्रपटातून होणारे पदार्पणही लांबणीवर पडल्याचे सांगितले जात आहे.

Sreeleela : ‘पुष्पा २’मधील गाजलेल्या आयटम साँगमुळे देशभरात लोकप्रिय झालेली दाक्षिणात्य अभिनेत्री श्रीलीला लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. खरंतर श्रीलीला तिच्या वैयक्तियक आयुष्यामुळे देखील सतत चर्चेत असते. साऊथचा पडदा गाजवल्यानंतर आता तिच्या बॅालिवूड डेब्यू चित्रपटाची मोठी उत्सुकता तिच्या चाहत्यांना लागली आहे.
अशातच तिच्या पहिल्या बॅालिवूड चित्रपटाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. सुरुवातीला अशी चर्चा होती की ती अभिनेता कार्तिक आर्यनसोबत पदार्पण करेल. मात्र, आता तिच्या बॉलिवूड एन्ट्रीचा मार्ग बदलल्याचे बोलले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कार्तिक आर्यन आणि अनुराग बासू यांच्या आगामी रोमँटिक चित्रपटाचे काम काही कारणामुळे पुढे ढकलण्यात आले आहे. परिणामी श्रीलीलाचे त्या चित्रपटातून होणारे पदार्पणही लांबणीवर पडल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, आता श्रीलीला अभिनेता सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खानसोबत ‘दिलर’ या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करू शकते, अशी जोरदार चर्चा आहे. या चित्रपटाची अधिकृत प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहीर झालेली नसली तरी दिवाळी २०२६ च्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हेही वाचा : Maharashtra Politics : मविआचा एक आमदार फुटणार? संजय राऊतांनी थेट नाव घेत केला धक्कादायक दावा
‘दिलर’चे दिग्दर्शन कुणाल देशमुख करत असून, या चित्रपटाची निर्मिती मॅडॉक फिल्म्सच्या बॅनरखाली होत आहे. इब्राहिम अली खान या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार असून, श्रीलीलासोबतची त्याची जोडी प्रथमच मोठ्या पडद्यावर पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
दरम्यान, ‘पुष्पा २’मधील श्रीलीलाने तिच्या किसिक गाणावरील आयटँम साँगमुळे प्रेक्षकांची मने जिंकली. या गाण्यामुळे तिला मोठी प्रसिद्धी मिळाली आणि अनेक चित्रपटांची तिला अॅाफर आल्याचे सांगितले जाते. तुर्तास तिला मिळालेल्या चित्रपटांची नावे अधिकृतरित्या समोर आलेली नाहीत.





