अभिनेत्री ‘श्रीलीला’ हिला लागली लॉटरी ! कार्तिकनंतर आणखी एका हँडसम अभिनेत्यासोबत झळकणार

Sreeleela New Movie | दक्षिणात्य अभिनेत्री श्रीलीला ‘पुष्पा-२’ या चित्रपटातील आयटम साँगमधून प्रसिद्धीच्या झोतात आली. गेल्या काही काळापासून कार्तिक आर्यनसोबतच्या नव्या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच श्रीलीला आणखी एका बिग बजेट प्रोजेक्टची ऑफर देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. बॉलिवूडमधील तिच्या पदार्पणाबाबत चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, डान्सिंग क्वीन म्हणून प्रसिद्ध असलेली श्रीलीला दिग्दर्शक राज शांडिल्य यांच्या आगामी बिग बजेट चित्रपटात झळकण्याची शक्यता आहे. अलिकडेच, श्रीलीला निर्माते महावीर जैन यांच्यासोबत स्पॉट करण्यात आलं, त्यानंतर ती राज शांडिल्य यांच्या आगामी चित्रपटात काम करणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. या चित्रपटात श्रीलीला बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रासोबत रोमान्स करताना दिसणार असल्याचं म्हटलं जात आहे. Sreeleela New Movie |
View this post on Instagram
महावीर जैन यांनी इन्स्टाग्रामवर श्रीलीलासोबतचा एक फोटो शेअर केला आणि लिहिले, “आनंद एल राय सर यांच्या जादूला सुंदर आणि प्रतिभावान श्रीलीलासोबत पाहण्याची इच्छा आहे.” मात्र, निर्मात्यांनी याबाबत अद्याप अधिकृत पुष्टी केलेली नाही. चाहते या जोडीची केमिस्ट्री पाहण्यासाठी आतुर आहेत. जर या दोघांनी एकत्र काम केले तर, श्रीलीलाचे बॉलिवूड पदार्पण दक्षिण आणि हिंदी चित्रपटसृष्टीच्या चाहत्यांसाठी एक खास पर्वणी ठरू शकते. याशिवाय श्रीलीला लवकरच अनुराग बसू दिग्दर्शित सिनेमातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार आहे. Sreeleela New Movie |
हेही वाचा:





